धाराशिवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; ‘जय भीम’च्या जयघोषाने शहर दुमदुमले!
तुळजापूर प्रतिनिधी :- जय भीम च्या जयघोषाने दुमदुमले धाराशिव शहर धाराशिव जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती, धाराशिव यांच्या वतीने १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या विशाल मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अभिवादन आणि अन्नदान
मंगळवारी सकाळी १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंबेडकर चौक येथे जयंतीनिमित्त भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
मिरवणुकीचा भव्य प्रारंभ
दुपारी ठीक ५ वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी मा. राजाभाऊ (दादा) ओहाळ, विद्यानंद दादा बनसोडे, डॉ. राजगुरू सर, सतीश घोडेराव आणि दत्ताजी पेठे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या भव्य फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.
तरुणाईचा उत्साह आणि डीजेचा थरार
मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाई मोठ्या संख्येने थिरकली. निळ्या फेट्यांमध्ये आणि हाती निळे ध्वज घेतलेले हजारो भीमसैनिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण धाराशिव शहर दुमदुमून गेले होते.
समितीची उपस्थिती
या यशस्वी आयोजनासाठी समितीचे मार्गदर्शक विद्यानंद दादा बनसोडे, आधारस्तंभ रामराजे पाटील (लोकमंगल समूह) आणि प्रमुख सल्लागार सतीशजी घोडेराव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी:
अध्यक्ष: राहुल माळाळे
उपाध्यक्ष: कपिल ढगे
कार्याध्यक्ष: सूर्यनंद बनसोडे
आयोजक: रोहन बनसोडे व वैभव बनसोडे
सचिव: सपकाळ आणि बादल बनसोडे
यांच्यासह मध्यवर्ती जयंती समारोह समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. आबाल वृद्ध, तरुण वर्ग, व महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.








