*बदलापूर येथे लोकशाही पत्रकार संघाचा पत्रकार प्रशिक्षण मेळावा व पदाधिकारी नियुक्ती समारंभ दि.२३ एप्रिल रोजी ९ते ३ दरम्यान उत्साहात संपन्न*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
*बदलापूर (जि. ठाणे) – लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित पत्रकार प्रशिक्षण मेळावा तसेच पदाधिकारी नियुक्ती समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संघाचे महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. किशोर दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.*
*कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. रुचिता ताई घोरपडे उपस्थित होत्या. त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सकारात्मक पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.* यावेळी त्यांनी आनंदाची बातमी देत लवकरच नगरपालिकेमध्ये पत्रकार कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच नवोदित पत्रकारांनाही प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. नितीनजी पाटील साहेब यांनी पत्रकारांना संबोधित करताना जबाबदार पत्रकारितेवर भर दिला. “बातमी देताना दोन्ही बाजूंची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी सत्य, निष्पक्ष आणि जबाबदार वृत्तांकनाचे महत्त्व स्पष्ट केले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा युवा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. किशोर दादा पवार यांनी युवा पत्रकारांचे नेतृत्व, करिअर संधी आणि नव्या पिढीची भूमिका या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कौशल्यविकास, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि मजबूत नेटवर्किंग यावर भर देत पत्रकारांनी आधुनिक युगाशी जुळवून घेत प्रगती साधावी, असे प्रेरणादायी विचार मांडले. तसेच संघटनेची उद्दिष्टे स्पष्ट करत सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये संघटनात्मक कार्य अधिक ताकदीने करण्याच्या सूचना दिल्या.*
राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. भागवत वैद्य साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेची एकजूट, पत्रकारांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यावर भाष्य करत संघटनात्मक बळकटीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित पत्रकारांना प्रेरणा मिळाली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. संदीप भाऊ जाधव यांनी प्रशिक्षण मेळाव्याचे सखोल मार्गदर्शन करत पत्रकारितेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रदेश अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव साळुंखे साहेब यांनी संघटनेच्या विस्तारासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करत पत्रकारांना एकजुटीचा संदेश दिला.
माध्यम सल्लागार, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मा.विधी पळसापुरे मॅडम यांनी विशेषत: महिला पत्रकारांना मार्गदर्शन करत त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. तसेच विशेष उपस्थित निवृत्त न्यायाधीश मा. श्री. संतोष कुमार जयस्वाल साहेब यांनी कायदेविषयक माहिती देत पत्रकारांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
*यावेळी विशेषतः किशोर दादा व त्यांच्या संपूर्ण टीमकडून आरती राठोड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आरती मॅडम यांनी कार्यक्रमाचे अतिशय उत्तम व सुयोग्य नियोजन केले तसेच सूत्रसंचालनही अत्यंत प्रभावी व सुंदर पद्धतीने पार पाडले. तसेच निलेश जी खंडारे यांनी सर्व गोष्टींचे उत्कृष्ट नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे व सुरळीत पार पाडला.*
या कार्यक्रमाला मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः मराठवाडा महिला अध्यक्ष पंचशीला कांबळे मॅडम, मराठवाडा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, विदर्भ महिला अध्यक्ष रेणुका जयस्वाल मॅडम तसेच मराठवाडा युवा अध्यक्ष प्रतीक जयस्वाल यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
*तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामध्ये धाराशिव युवा जिल्हाध्यक्ष राहुलजी थोरात,* लातूर महिला जिल्हाध्यक्ष राहू पाटील, धाराशिव महिला उपाध्यक्ष कविता घोडके, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नुकुल सोनवणे, पुणे युवा उपाध्यक्ष निखिल घोडके, उमरगा युवा महिला अध्यक्ष रेणुका कटके यांचा समावेश होता.
*सर्व नव्याने नियुक्त पत्रकारांनी किशोर दादा यांना सांगितले की,“दादा,तुमचं कार्य खूप चांगलं आहे. आपण असंच उत्तम काम करत राहा. आम्ही सर्व पत्रकार नेहमी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”*
एकूणच, हा पत्रकार प्रशिक्षण मेळावा नवोदित व कार्यरत पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला. संघटनेच्या पुढील वाटचालीस नवे बळ देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.






