Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांची व पालकांची एकच गर्दी : अनेक विद्यार्थ्याचे जात पडताळणी प्रस्ताव चार पाच महिन्यात पासुन प्रलंबित कर्मचारी यांची बेजबाबदार उत्तरे!

धाराशिव जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांची व पालकांची एकच गर्दी : अनेक विद्यार्थ्याचे जात पडताळणी प्रस्ताव चार पाच महिन्यात पासुन प्रलंबित कर्मचारी यांची बेजबाबदार उत्तरे
——————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
वेळच्या वेळी सुनावणी न झाल्यामुळे दि.१३ मे२०२६ रोजी धाराशिव जिल्हा जात पडताळणी कार्यल्यात झालेल्या सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांची व पालकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.अनेक विद्याथ्यांचे जात पडताळणी अर्ज गेली तीन-चार महिने पेंडिंग असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असी चिंताजनक चर्चा विद्यार्थी व पालकालून होत असून शालेय विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात यावे अशी मागणी लाभार्थी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
.सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी विज्ञान मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी उदारणार्थ मेडिकल, पॉलिटेक्निकल आभियांत्रिकी वगैरे प्रवेशासाठी जात पडताळणीची गरज असते म्हणून त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २o२५ मध्ये संबंधित कॉलेज मार्फत जात पडताळणीसाठी धाराशिव जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज दाखल केले खरे पण त्या अर्जावर अध्यापक वेळच्या वेळी कार्यवाही किंवा सुनावणी झाली नाही त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप पेंडिंग (प्रलंबित )आहेत तर काहीना अतां त्रुटीचे संदेश पाठविले जात आहेत.या संदर्भात पोच पावती घेऊन संबधिताकडे चौकशी केली असता पडताळणी झालेली आहे पण कधी अपलोड करून लाभार्थी विद्यार्थ्याकडे पाठविण्यात येईल हे सांगता येत नाही.अपलोड करायचे बाकी आहे अपलोड कधी होणार आणि तुम्हाला तुमच्या मेलवर कधी मिळणार हे सांगता येणार नाही अशी बे जबाबदार उत्तरे येथील संबंधित कर्मचारी देतात असे समजते त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत कारण इयत्ता दहावी व बारावी परीक्षा निकाल लागला असून दहावीनंतर पॉलिटेक्निकल आयटीआय वगैरे व्यवसायिक प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असतात तर बारावी विज्ञान नंतर काही विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवण्याकरिता प्रयत्न करतात.त्यासाठी त्यांना जात पडताळणी दाखल्याची अत्यंत गरज असते.जर वेळेत हे दाखले नाही मिळाले तर कदाचित त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळेल का नाही या चिंतेत अनेक विद्यार्थी असल्याचे समजते.तेव्हा संबंधित जात पडताळणी कार्यालयाने.किमान दर आठवड्याला एकदा सुनावणी ठेवून विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रस्ताव त्वरीत निकाली काढावे.कारण लवकरच पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तत्पूर्वी विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखला मिळाला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कुटुंबातले रक्त नात्यातिल जात पडताळणी झालेला दाखला पुरावा म्हणून जोडलेला असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक पुरावे दाखल करा अशी टिपणी टाकून अनेक विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रस्ताव रिजेक्ट केल्याचेही समज ‘तरी ज्या विद्यार्थ्यांनी रक्त नात्यातील जात पडताळणीचा दाखला पुरावा म्हणून जर आपल्या प्रस्तावाबरोबर सादर केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची जाचक अट न लावता त्यांना दाखला देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यी व पालकांमधून होत आहे.
तर धाराशिव जिल्ह्यातील जात पडताळणी कार्यालयाच्या बेजबाबदार कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे व विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी दाखले द्यावेत अशी मागणी सुनावणी दरम्यान उपस्थित पालक व विद्यार्थी वर्गातून होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india