कडदोरा व बलसुर येथील डीपीचे प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील कडदोरा व बलसुर येथील पाणीपुरवठा विहिरीस २४ तास अखंडित विद्युत पुरवठा मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन २५ के व्ही .डीपीचे उद्घाटन भाऊसाहेब बिराजदार सह साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते दि . १८ रोजी संपन्न झाले.
गावातील पाणीपुरवठा विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असूनही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार बलसुर तांडा येथील गावठाणातून पाणीपुरवठा विहिरीपर्यंत नवीन विद्युत १८ पोलसहीत लाईन टाकून २४ तास अखंडित विद्युत पुरवठा करणारा २५ के व्ही . डीपी बसवण्यात आली . या कामामुळे आता दोन्ही गावांचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियमित होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उद्घाटन प्रसंगी बलसुर येथील ग्रामपंचायत उपसरपंच आयुब पटेल, ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, माधव नांगरे, दत्तू चव्हाण, किसन चव्हाण, महात्मा गांधी तंटामुक्तिचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सत्यनारायण जाधव,वसंत साखरे, उमाकांत सूर्यवंशी, रशीद घुडसे, बन्सीलाल चव्हाण, आर.सी. चव्हाण, गुलाबदास चव्हाण, विपुल चव्हाण, सुधीर नांगरे, विशाल दादा पाटील, बलभीम मिरगुडे, मनोज साखरे ,कडदोरा येथील साहेबराव पाटील,प्रदीप बालकुंदे, रविंद्र मुगळे, बालाजी रणखांब, सरपंच सुनंदा रणखांब, कमलाकर रणखांब,दगडू कांबळे, ग्रामसेवक प्रशांत भोसले, संदीप पाटील, खंडू बालकुंदे, भरत रणखांब, संतोष आणि नगर सुरवसे, शरद रणखांब, बाळू कुंभार यांच्यासह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






