Best News Portal Development Company In India

तिरट जुगार खेळणाऱ्यांची उडाली त्रेधा तिरपट धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई 29 जणांना अटक!

तिरट जुगार खेळणाऱ्यांची उडाली त्रेधा तिरपट
धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई 29 जणांना अटक!
तुळजापूर प्रतिनिधी;-धाराशिव जिल्ह्यातील अवैधनविरोध स्थानिक गुन्हे शाखेने कसली कंबर बहुतेक ठिकाणी धाडसत्र व अटक सत्र.
प्राप्त माहितीनुसार अवैध जुगार विरोधी कारवाई
मा. पोलीस अधीक्षक, धाराशीव श्रीमती रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल मोहिते (परि. पोलीस उपअधीक्षक) यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या ७ चक्री जुगार अड्ड्यांवर आणि २ अवैध तीन पत्ती (तिरट) क्लबवर पथके तयार करून दिनांक २१/०५/२०२६ रोजी छापेमारीची धडक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये श्री. अमोल मोहिते (परि. पोलीस उपअधीक्षक) यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक श्री. विजय आटोळे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. रामचंद्र बहुरे तसेच पोलीस अंमलदार व चालकांनी सहभाग घेतला.उक्त कारवाईदरम्यान एकूण ९ गुन्हे परंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, संबंधित ९ कारवाईची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:१) गोल्डन चौक, आठवडी बाजाराच्या बाजूला, परंडा.२) गोल्डन चौक, आठवडी बाजाराच्या बाजूला, परंडा.३) गोल्डन चौक, आठवडी बाजाराच्या बाजूला, परंडा.४) गोल्डन चौक, बस स्थानकासमोरील बाजू.५) गोल्डन चौक, बस स्थानकासमोरील ‘बुलबुल कलेक्शन’च्या समोर.६) गोल्डन चौक, बस स्थानकाजवळील रमाई चौक.७) गोल्डन चौक, बस स्थानकासमोरील ‘समर्थ जेन्ट्स पार्लर’.८) कुर्डुवाडी रोड, ‘जगताप ढाबा’ (परंडा) येथील बाजूच्या खोलीत (क्लब).९) संत मीरा शाळेच्या पाठीमागे, करमाळा रोडच्या डाव्या बाजूला, निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये (क्लब).
सदर कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण २९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ आणि ५ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आरोपींकडून जुगाराच्या साहित्यासह रु. ४,९३,०३३/- रोकड आणि अंदाजे रु. ८,०८,७००/- किमतीचा इतर मुद्देमाल, असा एकूण रु. १३,०१,७३३/- (अक्षरी रुपये तेरा लाख एक हजार सातशे तेहतीस फक्त) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा दिला असून, धाराशीव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
अशा कठोर कारवाईमुळेच धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसेल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india