Best News Portal Development Company In India

राजमाता अहिल्या होळकर यांचे विचार आणि कार्य ! चिंतन:- भूमिपुत्र वाघ.

*राजमाता अहिल्या होळकर यांचे विचार आणि कार्य*

*चिंतन:- भूमिपुत्र वाघ*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
मित्रांनो,अहिल्यामाता होळकर यांच्या जीवनाबद्दल आपण थोडसं डोळस पणाने आज पाहणार आहोत.
पहिल्यांदा जयंती निमित्ताने जगातल्या सर्व समतेचा विचार पेरणाऱ्या भावंडांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
भारतीय इतिहासातील अत्यंत आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी केवळ राज्यकारभारच उत्तम प्रकारे सांभाळला नाही, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे कार्य केले.त्यांच्या राजवटीला *लोककल्याणकारी राजसत्ता* म्हणून ओळखले जाते.
अहिल्या माता होळकर यांची राजसत्ता यांनी इ.स. 1767 ते 1795 या काळात मालवा प्रदेशावर राज्य केले. त्यांची राजधानी माहेश्वरी येथे होती.
त्यांच्या राजसत्तेची वैशिष्ट्ये
प्रजेवर मातेसारखे प्रेम करणारी शासक म्हणून त्यांची ओळख होती.
न्यायदान अत्यंत निष्पक्ष व तत्पर असे.
गरीब, शेतकरी, विधवा आणि दुर्बल घटकांना संरक्षण दिले.
करप्रणाली सुलभ ठेवून शेतकऱ्यांना आधार दिला.
रस्ते, विहिरी, तलाव, घाट आणि धर्मशाळा बांधून लोकजीवन सुधारले.
स्त्रियांना सन्मान आणि धार्मिक स्वातंत्र्य दिले.
धार्मिक कार्य
अहिल्याबाई होळकर यांचे धार्मिक कार्य संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि नवीन मंदिरे बांधली.
प्रमुख धार्मिक कार्ये
काशी विश्वनाथ टेम्पल मंदिराचा जीर्णोद्धार केला.
सोमनाथ टेम्पल मंदिर पुनर्बांधणीसाठी मदत केली.
त्रिंबकेश्वर शिव टेम्पल परिसरात घाट व धर्मशाळा उभारल्या.
गया विष्णुपंद टेम्पल येथे बांधकाम कार्य केले.
द्वारकाधीश टेम्पल आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांना दान दिले.
यात्रेकरूंकरिता धर्मशाळा, अन्नछत्र आणि पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या.
अहिल्या मातांचे विचार
“राज्य हे प्रजेच्या कल्याणासाठी असते” हा त्यांचा मूलभूत विचार होता.
साधेपणा, भक्ती आणि सेवा यांना त्यांनी महत्त्व दिले.
*धर्म म्हणजे मानवसेवा असे त्यांचे आचरण होते.*
पाच हजार मंदिराचा जीर्णोद्धार करणारी अशी ती राजमाता.
पाण्याची गरज महत्व ओळखून मोठमोठी धणे बांधणारी ती राजमाता.
राज्य हे प्रजेच असतं आणि प्रजेसाठी प्रजेच्या सुखासाठी करायचा असतं ही प्रकल्भ बुद्धी समता, स्वातंत्र्याचा विचार करणारी ती राजमाता.
अशाच थोर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले, सावित्री माता फुले,सयाजीराव गायकवाड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या महान विभूतीनी आपल्या कार्याची ओळख जगाच्या स्मृतीपटलावर काय मुजवली….

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.