Best News Portal Development Company In India

आरपीआय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पत्रकार शुभम कदम निवडणुकीच्या रिंगणात

आरपीआय आठवले पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता शुभम कदम निवडणूक रिंगणात

आर पी आयच्या चिन्हावर निवडणूक लढवणार!

एक नेता एक पक्ष एक झेंडा प्रमाण मानून काम करणारा निष्ठावान कार्यकर्त्याला अखेर उमेदवारी

तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर
स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीत महायुतील घटकमित्र असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्ता पत्रकार युवक तालुकाध्यक्ष शुभम कमलचंद कदम यांनी प्रभाग क्रमांक २( अ)मधून उमेदवारी अर्ज दाखल केली असून रिपाइं आ पक्षाने अधिकृत ए. बी फार्म देवून पक्षाशी एक निष्ठ राहिल्यास पक्ष नक्कीच न्याय देतो हे पक्ष नेतृत्वाने दाखवून दिले आहे..

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या डॉ रामदास आठवले यांच्या पक्षाला भाजपा महायुतीने तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकत एक ही जागा सोडली नसल्याने अखेर निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या पत्रकार, युवक तालुकाध्यक्ष म्हणून सर्वत्र परिचित असलेले शुभम कमलचंद कदम यांनी मित्र पक्षाकडे रिपाइं आ पक्षाला
जागा सोडा उमेदवारी द्या अशी मागणी न करता पक्षाला निवडणूक आयोग निवडणूक निर्णय अधिकारी जे निवडणूक चिन्ह देतील त्या चिन्हावर स्वबळावर निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतला आहे. तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक २,५,६,८ हे चार प्रभागात आरक्षण सोडत झाली होती.प्रभाग क्रमांक २अ पुरुष,प्रभाग क्रमांक ६ हे दोन पुरुष आणि प्रभाग क्रमांक ५, आणि प्रभाग क्रमांक ८ हे दोन महिला आरक्षण असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने केवळ एक प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाच्या जागेवर दावा केलेला होतो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुती मित्र पक्षाने युती केली तर त्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढा जिथे सर्व मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढतील तिथे भाजपा सोबत राहून निवडणूक लढवावी आणि जर भाजप रिपब्लिकन पक्षाला सोबत घेत नसेल तर स्वबळावर निवडणूक लढवून निवडून यावे असे आदेश दिले होते. भाजपाने रिपब्लिकन पक्षाशी हात मिळवणी न करता एकला चलो रे चा नारा दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता युवक तालुकाध्यक्ष यांनी आठवले साहेबांच्या आदेशानुसार पक्ष टिकेल तर नेतृत्व टिकेल पक्षासाठी आपण स्वता स्वबळावर निवडणूक लढण्याची भुमिका घेऊन उमेदवारी दाखल केली आहे.
एक नेता एक पक्ष एक झेंडा एक नेता प्रमाण मानून विद्यार्थी दशकापासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याने उमेदवारी दाखल केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली शालेय जीवनापासून ‘एक नेता एक पक्ष एक झेंडा प्रमाण मानून सामाजिक कार्य करत
रिपब्लिकन पक्षाचा विचार ध्येय धोरण सामान्य माणसापर्यंत पोहोचवून प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतो आहे.

शालेय जीवनात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा तुळजापूर तालुकाध्यक्ष, युवक तालुका सरचिटणीस आणि सद्या तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असून तुळजापूर शहरामध्ये विविध दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे.

समाजाच्या अन्याय अत्याचाराला आपल्या बातमीतून वाचा फोडण्याचे सामान्य लोकांना शासनाच्या सेवा सुविधा मिळवून, प्रशासकीय न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मी राहत असलेल्या प्रभागात, वार्डामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मी गरिब प्रामाणिक तळमळीचा पत्रकार म्हणून सामान्यातील सामान्य नागरिकांसह मी परिचित आहे.

तुळजापूर रिपब्लिकन पक्षाचा युवक तालुकाध्यक्ष तथा उच्च शिक्षित शुभम कदम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे तुळजापूर नगर परिषदेची २०२५ सार्वत्रिक निवडणूक शहरातील प्रभाग क्रमांक २ (अ) मधून मी पक्षाचा उमेदवार म्हणून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रिपब्लिकन पक्षाने निस्वार्थ प्रामाणिकपणे पक्षाचे समाजाचे काम केल्यास निश्चितच पक्ष आणि समाज कार्यकर्त्याला न्याय देतो याची प्रचती
पक्ष नेतृत्वाने निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देवून निष्ठेचे फळ देवून दाखवून दिले आहे.

चौकट शुभम कमलचंद कदम यांनी केलेले सामाजिक कार्य

महामानव बौध्दीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा,जिल्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,
गोरगरीब निराधार महिलांना साड्यांचे वाटप, पारधी समाजातील बांधवांच्या कुटुंबीयांना किराणा साहित्याचे किट वाटप,पक्ष वाढीस सभासद नोंदणी सहभाग, पक्षाच्या आंदोलन, मोर्चे निदर्शने,जिल्हास्तरावरील विशेष बैठका तालुकास्तरावरील बैठका, राज्यव्यापी अधिवेशन, राज्यव्यापी मेळाव्यासह पक्षाच्या विविध कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Jan Awaz | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail