नळदुर्गच्या मातीशी नाळ असलेले आणि विकास कामे करण्याची धमक असलेले उद्योजक अशोक जगदाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून द्यावे : अमित देशमुख
———————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
नळदुर्ग नगरीच्या मातीशी नाळ असलेले आणि विकास कामे करण्याची धमक असलेले राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना (उबाठा ) महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उद्योजक अशोक जगदाळे व महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजय करून राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या ताब्यात नळदुर्ग नगर परिषदेच्या तिजोरीची चावी द्यावी असे आवाहन माजी मंत्री अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित भैय्या देशमुख’ (लातूर) यांनी येथे बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषद निवडणूक २०२५ निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या नळदुर्ग येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक भाऊ जगदाळे व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ प्रतोदअखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित भैय्या देशमुख व धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या येथील भवानी चौकात जाहीर सभेचे आयोजन नळदुर्ग शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी नामदार अमित भैया देशमुख बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षाला विकासाचा वारसा असून काँग्रेसला मत म्हणजे विकासाला मत होय. यावेळी खासदार ओमदादा निंबाळकर,आमदार प्रविण स्वामी, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, आदींचीही समय सूचक पर भाषणे झाली.या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राजेश शेरखाने, तुळजापूर तालुका अध्यक्ष रामचंद्र दादा अलुरे, इमाम शेख, शिवसेना (उबाठा) चे कमलाकर चव्हाण सरदार सिंग ठाकूर संतोष पुदाले सह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार नगरवासी महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.






