Best News Portal Development Company In India

आ. राणा जगजीत सिंह पाटील निरीक्षणात, गंगणे आघाडीवर? मतदानानंतर राजकीय गणिते बदलली.

आ.राणाजगजितसिंह पाटील निरीक्षणात, गंगणे आघाडीवर? मतदानानंतर राजकीय गणिते बदलली

८० टक्के मतदानाने तुळजापूर तापला; भाजपची ‘विकास’ फळी मजबूत संकेत

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत तब्बल ८० टक्के मतदान होऊन शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. मतदारांच्या अभूतपूर्व उत्साहामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतदान संपताच तुळजापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मतदारांनी शांततेत व मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या प्रचाराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानातही दिसून आला. विकासाभिमुख धोरणे आणि सर्वसमावेशक नेतृत्व या गंगणे यांच्या निवडणूक मुद्द्यांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

भाजपकडून प्रभागनिहाय उमेदवार म्हणून औदुंबर कदम, दिनेश शिरसागर, लखन पेंदे यांनी दमदार मोहीम राबवली असून मतदानानंतर कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट उत्साह पाहायला मिळाला. नगरपरिषदेमध्ये स्थिर सत्ता आणण्याचा निर्धार या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

शहरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणारे जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके यांनी देखील आजच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदारांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी संपूर्ण शहरातील मतदान व्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुळजापूरकरांनी आज पुन्हा एकदा लोकशाहीप्रती असलेला विश्वास दाखवला. विकासाच्या राजकारणावर आमची ठाम भूमिका आहे,” असे ते म्हणाले.

मतमोजणीची उलटी गणती सुरू झाली असून तुळजापूरकरांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india