वागदरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
____________________________________
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वागदरी ता.तुळजापूर येथे अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमि
येथिल पंचशील बुद्ध विहारात अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच तथा पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे, युवा कार्यकर्ते शंकर आप्पा भंडारे, गणेश बिराजदार यांच्या हस्ते पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अभिवादन पर बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले ) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा
पत्रकार एस.के.गायकवाड म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी,देश सेवेसाठी खर्चित केले असून भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम उपेक्षिताना
मानवी हक्क हिरावून बसलेल्या माणवाला घटनात्मक दृष्ट्या मानवी हक्क मिळवून दिले. देशातील प्रत्येक घटकासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले असून त्यांचे कार्य आणि विचार भावी हजारो पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची ही भाषणे झाली.
यावेळी अनिल वाघमारे,हनुमंत वाघमारे,कुंडलिक वाघमारे,बाळू कांबळे,अकाश झेंडारे,मदन चव्हाण,सूर्यकांत वाघमारे,माजी उपसरपंच कविता गायकवाड मुक्ताबाई वाघमारे, ठकुबाई वाघमारे,श्रीदेवी वाघमारे, शकूंतलाबाई वाघमारे, राहीबाई वाघमारे, कोमल झेंडारे,प्रमिला वाघमारे,सविता वाघमारे, शितल झेंडारे, स्वाती गायकवाड, सुष्मा वाघमारे, राधाबाई वाघमारे,सह कार्यकर्ते उपस्थित होते.






