Best News Portal Development Company In India

दक्षिण आफ्रिकेत मोहंम्मद अयाज यांचा सांस्कृतिक कार्यक्रम .

दक्षिण आफ्रिकेत मोहंम्मद अयाज यांचा सांस्कृतिक कार्यक्रम .

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव

महाराष्ट्राचे महागायक विजेते व सोलापूर चे सुपुत्र मोहंम्मद अयाज 26 आक्टोंबर ला दक्षिण आफ्रिकेच्या सांगीतीक दौऱ्यावर रवाना होत आहेत. आपल्या मधुर आवाजाच्या माध्यमातून भारतीय संगीताची परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले अयाज यांनी गझल, भक्तिगीते, देशभक्तिपर गीते आणि विविध भाषांतील सादरीकरणातून रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.पद्मविभूषण आशाताई भोसले , अनुराधाजी पौडवाल,उषाताई मंगेशकर, सुदेश भोसले , सुरेश वाडकर , अनुप जलौटा , साधना सरगम, वर्षा उसगांवकर, सपना अवस्थि सारख्या कलाकारांसोबत अयाज यांनी कार्यक्रम सादर केलेला आहे . त्यांना ‘महाराष्ट्र श्री सन्मान’, तसेच महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाशी संबंधित गौरव मिळालेला आहे. विशेष म्हणजे, ते सोलापूर जिल्ह्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही कार्यरत आहेत. या दौऱ्यातून भारतीय संगीताची सांस्कृतिक परंपरा दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायापर्यंत आणि संगीतप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. हा दौरा सोलापूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संगीताची ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.अयाज यांचा सर्वं स्तरावरून कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india