Best News Portal Development Company In India

दुष्काळग्रस्त शेतकरी अन् निराधारांची दिवाळी होणार गोड! पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक सर यांच्या हस्ते ‘दिवाळी शिधा’ किटचे वाटप.

दुष्काळग्रस्त शेतकरी अन् निराधारांची दिवाळी होणार गोड! पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक सर यांच्या हस्ते ‘दिवाळी शिधा’ किटचे वाटप.

​तामलवाडीत शिवसेना (शिंदे गटा) कडून गरजू, विधवा व दिव्यांगांना मदतीचा हात
​”मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण” – उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उपक्रम.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
दुष्काळग्रस्त भागातील गरीब शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग आणि निराधार घटकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून ‘दिवाळी शिधा’ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते गरजू लाभार्थ्यांना या शिधा किटचे वाटप करण्यात आले.

​हा विशेष उपक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

​प्रत्येक बूथवर ३० किटचे वाटप-
​या उपक्रमांतर्गत प्रत्येक बूथनिहाय नियोजन करून एका बूथमध्ये ३० गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि इतर निराधार घटकांना प्राधान्य देण्यात आले.

​”मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण”
​शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा जपली आहे. एन दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी व गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक क सर, तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, तुळजापूर तालुक्याचा बुलंद आवाज देवानंद (भाऊ ) रोचकरी, जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते ऋषिकेश ( भैया )मगर, युवा नेते प्रतीक (भैया) रोचकरी, शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश रसाळ स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गरजू दिव्यांग ,विधवा, आणि निराधार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india