येरमाळा पोलिसांच्या हद्दीत धक्कादायक चोरी! पानगाव येथे गोठ्यातून १ लाख १५ हजारांची म्हैस व दोन रेडी लंपास.
तुळजापूर प्रतिनिधी:-
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानगाव शेतशिवारात अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला असून, एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि दोन रेडी (पिल्लू) अशा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या मुक प्राण्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी गणेश विश्वनाथ बेडके (वय ४१, रा. पानगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या पानगाव येथील शेत गट नं. ३०/अ मधील गोठ्यामध्ये हा प्रकार घडला. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरांनी फायदा घेऊन गोठ्यातील एक म्हैस आणि दोन रेडी चोरून नेले.
सकाळी गोठ्यात गेल्यावर जनावरे जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने शोधाशोध केली, परंतु काहीही पत्ता लागला नाही.
पोलिसांत गुन्हा दाखल.
या प्रकरणी फिर्यादी गणेश बेडके यांनी दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात येऊन प्रथम खबर (फिर्याद) दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करीत आहेत. शेतशिवारात चोरीच्या अशा घटनांमुळे परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.





