*गुरूवाडी येथे भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखेचे उदघाटन*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि..२५)भारतीय बौध्द महासभा संस्थापक बौधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष -डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीएस आय २५ मिशन अंतर्गत ५६ ग्राम शाखा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्या प्रमाणे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा उमरगा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवाडी येथे भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा क्र २० चे उदघाटन दि.२३ आक्टोबर रोजी तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते फलकाचे फित कापुन करण्यात आले.
या वेळी भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा फलक व भिमनगर प्रवेश कमानचे फित तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते कापुन फटाके, तारा मंडळ आतिषबाजी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौध्द महासभा च्या जयघोषना ने देऊन उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे, प्रमुख पाहुणे जिल्हा संघटक विद्या कांबळे, सरचिटणीस -सगीता सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष शिवराम आडसुळे, उपाध्यक्ष महिला विभाग रेखा कांबळे, महिला सचिव -उषा गायकवाड, तालुका सचिव धिरज कांबळे, मिलींद कांबळे, शिवाजी जाधव आदीजनाची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.तर त्रिशरण पंचशिल बुद्ध पुजा भिमस्मरण भिमस्तुती बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी घेतले.
या वेळी सर्व पदाधिकारी विद्याताई कांबळे,बौध्दाचार्य उमेश सुरवसे,संगीता सोनकांबळे,प्रा.शिवराम आडसुळे,रेखा कांबळे,धिरज कांबळे मिलींद कांबळे शिवाजी जाधव यांचा प्रथम सत्कार करण्यात आला.
बौध्दाचार्य उमेश सुरवसे बोलत असताना म्हणाले की, भारतीय बौध्द महासभा ही डॉ बाबासाहेब आंबेडकरानी मातृसंस्था म्हणून दिलेली आहे त्यामुळे आपण या मातृसंस्थेच्या २४ प्रशिक्षण शिबिरांचे प्रशिक्षण घेऊन ,सोबत त्रिशरण पंचशिल यांचे पालन करून जिवनातील अनंत दुःखाना दुर ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुरवसे यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरानी विज्ञानवादी दृष्टिकोन आसलेला धम्म आपणाला दिलेला आहे या धम्माचे आचरण करून आपण आपला परिवार ,मुलं व समाज यांच्या कल्याणासाठी अंध श्रद्धा मुक्त जिवन जगण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी प्रा.शिवराम आडसुळे,विद्या कांबळे, संगीता सोनकांबळे,आदीजनानी मनोगत व्यक्त केले.
या वेळी सर्व शाखा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामशाखा अध्यक्ष कांचन गायकवाड, सरचिटणीस अंजली गायकवाड, कोषाध्यक्ष सविता गायकवाड, विश्वनाथ गायकवाड,मुकेश गायकवाड भाग्यवत गायकवाड,सुभाष गायकवाड, प्रथमेश गायकवाड,नटराज गायकवाड साखरचद गायकवाड, व्यंकट गायकवाड,बाळु गायकवाड, जालिंदर गायकवाड,विश्वनाथ गायकवाड, प्रविण गायकवाड,प्रेमनाथ गायकवाड, कांता गायकवाड,अरुणा गायकवाड, आम्रपाली गायकवाड,राजश्री गायकवाड,शालन गायकवाड,उषा गायकवाड,रेणुका गायकवाड,संतोषी गायकवाड,उमा गायकवाड,वनिता गायकवाड, अर्जुन गायकवाड, व्यंकट गायकवाड,अबु गायकवाड,मुद्रीका गायकवाड कल्लेश गायकवाड,रोहीत गायकवाड,रोहीणी गायकवाड,आदी जनाची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, मुकेश गायकवाड यांनी केले.









