Best News Portal Development Company In India

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नंदगाव येथे मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नंदगाव येथे मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिर संपन्न!
———————————————

नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील उर्फ राणा दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नंदगाव ता.तुळजापूर येथे सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व प्रथमोपचार शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

धाराशिव जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती, नंदगाव ता.तुळजापूर चे सुपुत्र सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांच्या पुढाकारातून व सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ नवी मुंबई,शासकीय सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव व प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने नंदगाव तालुका तुळजापूर येथे मोफत सर्व रोग निदान व प्रथमोपचार आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नंदगाव येथे करण्यात आले होते.

या प्रसंगी भाजपाचे किशोर धुमाळ, मल्लीनाथ गुड्डे, किशोर सुरवसे,मदन पाटील,सागर चौघुगे,रहिम शेख, अप्पू करंडे,परमेश्वर गब्बूरे, शिवानंद शरणार्थी सह ५१ रक्त दात्यानी रक्त दान केले तर ४७० रुग्नांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर व अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले.

या शिबिराचे उदघाटन पंचायात समिती तुळजापूर च्या उप सभापती सौ. रेणुका ताई विवेकानंद मिलगिरी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले,सुतार मामा,बाळू जाधव,विवेकानंद मिलगीरे,लक्ष्मण पाटील सह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india