Best News Portal Development Company In India

शिराढोण येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल सोनवणे यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन!

शिराढोण येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल सोनवणे यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन!
​
तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर तालुक्यातील मौजे शिराढोण येथील गट नं. १३४ ते ९५ पर्यंतच्या अंदाजे १ किलोमीटर अंतरावरील नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा शिराढोण वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल श्रीपतराव सोनवणे यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. अर्चकातााई राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

​निवेदनातील ठळक मुद्दे-
​पाणीपातळी वाढण्यास मदत- शिराढोण येथील या नाल्याच्या बाजूला शेतकऱ्यांच्या विहिरी असून, नाला खोलीकरण केल्यास विहिरींची पाणीपातळी वाढू शकते आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​तातडीने कामाची गरज- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे विठ्ठल सोनवणे यांनी म्हटले आहे.

​या महत्त्वाच्या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन नाला खोलीकरण करून द्यावे, अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली करण्यात आली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india