Best News Portal Development Company In India

पत्रकार शिवशंकर तिळगुळे यांचे दुःखद निधन;-नळदुर्ग (प्रतिनिधी)

पत्रकार शिवशंकर तिळगुळे यांचे दुःखद निधन
——————————————————
नळदुर्ग (प्रतिनिधी):
अणदूर तालुका तुळजापूर येथील दै.पुण्यनगरीचे निर्भीड व झुंजार पत्रकार आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व शिवशंकर तिरगुळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.२३ मार्च २०२६ रोजी रात्री १ वाजता वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी दुःखाद निधन झाले.
त्यांच्या अचानकपणे जाण्याने तिरगुळे कुटुंबीयावर दुःखा चा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातआहे.
. शिवशंकर तिरगुळे यांनी आपल्या आयुष्यात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी प्रामाणिकपणे काम केले,अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी झिजवली,तसेच विविध सामाजिक उपक्रमात ते अवर्जुन सहभाग घेत असत. ते चन्नबसव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सन २o१९ मध्ये ट्री बँकेची सुरुवात केली होती.अणदूर व परिसरात संस्थेच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड केली आहे. केवळ लागवड करूनच न थांबता दरवर्षी वृक्षाचा वाढदिवस साजरा करूनत अणदुर व परिसर हिरवा गार आणि सुंदर करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.अत्यंत संयमी आणि मितभाषिक प्रेमळ असं व्यक्तीमहत्व काळाच्या पडद्याआड झाले आहे.अणदूर येथेच त्यांचा पार्थिवावार लिंगायत धर्म संस्कारानुसार दफण करून अंतिम संस्कार करण्यात आले आहे.या प्रसंगी अणदूर,नळदुर्ग तुळजापूर, जळकोट,इटकळ व परिसरातील पत्रकार बंधू-भगिनी, विविध संस्था, संघटना, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई वडिल पत्नि, एक मुलगा, एक मुलगी, भावंडे असा परिवार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india