Best News Portal Development Company In India

अतनुर ता. जळकोट येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता !

अतनुर ता. जळकोट येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.

तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.

महाराष्ट्रातील संत परंपरा ही भक्ती, समता आणि समाजप्रबोधनाचा एक संपन्न वारसा आहे. ज्ञानेश्वरांनी रचलेला पाया, नामदेवांनी केलेला विस्तार, एकनाथांनी दिलेला आधार आणि तुकोबांच्या कळसाने सजलेला वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे. संत-कवयित्री बहिणाबाईंनी या परंपरेचे वर्णन ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे केले आहे, जे संतांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करते .
महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि त्यांचे कार्य:
संत ज्ञानेश्वरानी संत परंपरेचा पाया, ‘ज्ञानेश्वरी’द्वारे मराठीत तत्त्वज्ञान आणले .
संत नामदेवानी विठ्ठलभक्त आणि निर्भीड अभंगकार, ज्यांनी भक्तीचा प्रसार केला .
संत एकनाथानी समन्वयवादी संत, भारूडांद्वारे समाजप्रबोधन केले .
संत तुकारामानी अभंगांची क्रांती, सामान्य माणसाचा संतकवी म्हणुन ओळख.
संत चोखामेळा यानी समतेचा पुरस्कार करणारे दलित संत .
संत जनाबाई विठ्ठलभक्तीला घरकामात पाहणारी स्त्री संत.
संत सावता माळी श्रमालाच ईश्वर मानणारे शेतकरी संत.
समर्थ रामदास स्वामी दासबोध, शिवरायांचे मार्गदर्शक .
संत परंपरेची प्रमुख वैशिष्ट्ये:
वारकरी संप्रदाय: ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र, पंढरपूरची वारी, आणि विठ्ठल ही भक्तीची मुख्य देवता .
सामाजिक समता जात-पात विसरून सर्वसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवणे .
लोकभाषा अभंग, ओवी या सोप्या, मराठी भाषेतून तत्त्वज्ञान मांडले.
समन्वय भक्तीसोबतच समाज सुधारणेचा प्रयत्न .

संत साहित्याचे महत्त्व-
संत-परंपरेने महाराष्ट्राला एक नवीन विचारसरणी दिली. संतांनी देह झिजवून समाजउद्धाराचे कार्य केले, ज्यामुळे माणसाने माणुसकी आणि भेदभावरहित जीवन जगण्याचे शिकले. त्यांच्या अभंगांनी सामाजिक समतेची गुढी उभारली आणि मराठी मनाला एकसंध ठेवले.

ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,एकनाथ,चोखामेळा
या संतांनी आपल्या कार्यातून आणि साहित्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं. अतनुर येथे श्री संजीवन समाधी असलेले घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या नांवाने हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. संजीवन समाधी म्हणजे एका व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने, खोल ध्यान अवस्थेत प्रवेश करून, आपल्या शारीरिक देहाचा त्याग करणे. याला अनेकदा ‘जिवंत समाधी’ देखील म्हटले जाते, कारण व्यक्ती जिवंत असतानाच या अवस्थेत प्रवेश करतो. संजीवन समाधी घेणाऱ्या व्यक्तीचा आत्मा आणि शरीर हे एका विशिष्ट स्थितीत प्रवेश करतात, जिथे ते पूर्णपणे विलीन होतात.
*संजीवन समाधी घेतलेले श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांची १५० वी पुण्यतीथी साजरी करण्यात आली. ज्या घाळेप्पा स्वामी महाराज जिवंत समाधी घेतल्यानंतर पुर्ण एक वर्षानंतर समाधी काढण्यात आली तेव्हा त्यांचा डावा डोळा ऊघडा होता. तसेच समाधी घेते वेळी लावलेला दिवा एक वर्षानंतही तेवत होता. यावरुन संजिवन समाधिस्थ श्री घाळेप्पा स्वामी महाराजांचे देवत्व सिध्द होते. यामुळेच अतनूर पंचक्रोशी मधे श्री घाळेप्पा स्वामी महाराजाचे संतत्व आहे. महाराज नवसाला पावणारे,संकट समयी भक्ताला मदत करणारे अशी गाढ श्रद्धा आहे. महाराजाचा पुजनीय वार सोमवार आहे.श्रावण महिन्यात श्री घाळेप्पा स्वामी महाराज फक्त बेलपञी खाऊनच अनुष्ठाण करत असत म्हणुनच की काय महाराजाना दुध साखरेचा नैवेद किंवा दुधातील दशमीचा नैवैद दाखवला जातो.*
वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्‍ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.
वैशाख प्रतिपदा १ ते वैशाख शुद्ध सप्तमी पर्यत अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप शुक्रवारी पुरुषोत्तम पाटील महाराजाच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आला.
जळकोट तालुक्यातील अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची
सांगता हजारो जनसागराच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात झाली. अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात गेली सात दिवस सुरू होता. या सात दिवसांमध्ये दररोज भजन व पहाटे पाच वाजता काकड आरती होत होती. या सप्ताहाची बुधवारी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची गावात पायी दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. पायी दिंडी व शोभायात्रा मुख्य बाजार रस्त्यावरुन अंबाबाई मंदीर मार्गे बस स्टॅड मार्गे पाटलाच्या ईनामातुन कुंभार गल्ली,शाळेच्या मैदान अशी परिक्रमा करून भजनी मंडळीच्या हरिनामाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत संपूर्ण गावात
फिरून पायी दिंडी व शोभायात्रा परत शेवटी श्री काशी विश्र्वनाथ महाराज व संजीवन समाधी श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या पवित्र देवस्थान असणाऱ्या मंदिरात आली. पायी दिंडी व शोभायात्रा निघाली असता यात बालगोपालांसह टाळकरी महिला पुरुषांनी टाळमृदुंगाच्या आवाजावर फुगडीचा ठेका धरला. ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. श्री पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. व नंतर लगेच अन्नदाते सुर्यकांत पांचाळ व अतनुर ग्रामस्थ मंदिर समिती कडुन ठेवणण्यात आलेल्या महाप्रसादाला सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ अतनुर परिसरातील हजारो भाविक भक्तांनी घेतला. अशाप्रकारे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या सांगतेने शहर हरिनामाच्या गजरात, ढोलताशांच्या व फटाक्यांच्या अतिषबाजीने अक्षरक्षः दुमदुमले होते.
या पालखी सोहळ्यामधे महिला भावाकाचा मोठ्या प्रमाणात डोक्यावर कळस,तुळशी वृदांवन घेउन विविध कला प्रकार सादर करण्यात आले.पालखी गावातील मुख्य रसत्यावरुन जात असताना ग्रामस्थाकडुन थंड पाणी,मठ्ठा,खिचडी,रसना,चहा अशा प्रकारचे पेय देउन स्वागत करण्यात आले. आजचे वैशिष्ट्यै म्हणजे मुस्लिम समाजाकडुनही थंड पाणी व केळीचे वाटप करण्यात आले.मुस्लिम युवकाचाही यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता.माजी सैनिक आयुब शेख व ईस्माईल मुजेवार,आसाब मुंजेवार,शादुल मुंजेवार,बाबु मुंजेवार,चांदसुरज महागमे,मुबारक अतार,सलीम मुंजेवार,महेबुब शेख,रमजान तांबोळी,मेहराज मणियार,आशिफ पठाण,अलताफ शेख,असलम मूंजेवार,हज्जु मुंजेवार यांचाही सहभाग होता.
या सप्ताह यशस्वितेसाठी कमिटी अध्यक्ष विकास सोमुसे,ऊपाध्यक्ष गोविंद पाटील येवरे,हभप दयानंद स्वामी,प्रकाश पोलीस पाटील,चंद्रकांत जोशी गुरुजी,नामदेव कोकणे,माधव सोमूसे,सुर्यकांत पांचाळ,किसन मुगदळे,नामदेव कोकणे,चंद्रकांत जोशी,खजिनदार बाबु पंचगल्ले गुरूजी,दिलीप पाटील,प्रमोद संगेवार,बाळु कोडगीरे,अशोक पाटील माजी सभापती कृषी ऊत्पन्न बाजार समिती उदगीर,मारुती गुंडीले,श्रीधर पाटील गव्हाणे,श्रीमती मन्याबाई मधुकर पत्तेवार,पञकार संजय शिदे या सर्वानी सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मोलाचे योगदान व सहकार्य केले . मंदिरावर पुजेची व्यवस्थापक म्हणुन बाबु कदम, बाबु साकोळकर,गुरुनाथ कापसे यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच अन्य काही मंडळीनी आपल्या दिलेली जबाबदारी चोख पार पाडली व सात दिवसाचे अन्नदाते म्हणुन श्री काशी विश्र्वनाथल महाराज मंदिर संमिती तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india