Best News Portal Development Company In India

मराठवाडा नामविस्तार दिन आंबेडकर अनुयायांच्या अस्मितेचा विजय असून नामांतर लढा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे; एस .के. गायकवाड

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेचा विजय असून नामांतर लढा हा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे : एस. के. गायकवाड
————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
तब्बल १४ वर्षाच्या संघर्षमय लढ्या नंतर पँथर गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे सह अनेक भिम सैनिकांच्या बलिदानातून झालेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर (औरंगाबाद) चा नामाविस्तार दिन म्हणजे आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेचा विजय असून नामांतर लढा हा चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी वागदरी तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३२ व्या नामविस्तार वर्धापन दिना निमित्ताने वागदरी येथील पंचशील बुद्ध विहारात विद्यापिठ नामविस्तार वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी एस.के.गायकवाड बोलत होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना घेवून नामविस्तार दिनानिमित्ताने सामुदायिक रित्या तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलीस हवालदार संदिपान वाघमारे अनिल वाघमारे चंद्रकांत वाघमारे,दात्ता झेंडारे, रमेश वाघमारे, सूर्यकांत वाघमारे तसेच माजी उपसरपंच कविता गायकवाड, श्रीदेवी वाघमारे,वंदना वाघमारे, ठकुबाई वाघमारे,स्वाती गायकवाड,अर्चना वाघमारे, सुगंधा वाघमारे,प्रमिला रमेश वाघमारे,सुषमा वाघमारे गीताबाई झेंडारे,उज्वला वाघमारे सविता वाघमारे राहीबाई वाघमारे सह शालेय विद्यार्थी महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india