नळदुर्ग नगरपरिषद च्या उपनगराध्यक्षपदी नय्यरपाशा जाहागीदार यांची निवड
—————————————————
नळदुर्ग(एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी भाजपाचे जेष्ठ नेते नय्यरपाशा जहागीरदार यांची निवड करण्यात आली तर स्वीकृत सदस्यपदी पत्रकार सुधीर पोतदार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धनराज गायकवाड आदीची निवड करण्यात आली.
दि.१६ जानेवारी २०२६ रोजी नळदुर्ग येथिल नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली.या पदाकरिता भाजपा महायुतीच्या वतीने नय्यरपाशा जहागीदार तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मारुती खारवे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे या पदाकरिता मतदान घेण्यात आले.यामध्ये नय्यरपाशा जहागीरदार यान १२ मते मिळाली तर मारुती खारवे याना एकून ९ मते मिळाली. त्यामूळे नय्यरपाशा जहागीरदा याना तिन मताधिक्याने उपनगराध्यक पदी निवड करण्यात येत आल्याचे पिठासन अधिकारी यानी घोषीत केले.तसेच यावेळी भाजपाच्या वतीने प्रवीण धनराज गायकवाड तर काँग्रेसच्या वतीने पत्रकार सुधीर बाबुराव पोतदार यांची स्विकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या या सार्थ निवडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे,सर्व नगरसेवक व कार्तकर्ते, नगरवाशीयानी त्यांचे आभिनंदन केले.






