नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि जागतिक दृष्टी विकसित करणारे : डॉ. सय्यद अझरुद्दीन
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

“नवे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांमध्ये केवळ माहितीपुरते शिक्षण न देता सर्जनशीलता, नवोपक्रम, संशोधनवृत्ती आणि जागतिक घडामोडींची जाण विकसित करणारे आहे,” असे प्रतिपादन डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी केले. ते शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते.
कार्यशाळेतील आपल्या मार्गदर्शनात डॉ. अझरुद्दीन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील सर्जनशीलता, नवोपक्रम, कृती-आधारित संशोधन प्रकल्प आणि प्रशिक्षण या विषयावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतरावर भर न देता प्रत्यक्ष अनुभव, कृती-आधारित शिक्षण, प्रकल्पाधारित अध्ययन आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, स्वतंत्र विचार, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, जागतिक व्यापार व्यवस्थेचा प्रवास आणि अलीकडील युद्धांचा परिणाम या विषयावरही मार्गदर्शन केले. जागतिक व्यापार व्यवस्थेतील बदल, आर्थिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय करार, तसेच अलीकडील युद्धांचा व्यापार, उद्योग आणि रोजगार क्षेत्रावर होणारा परिणाम याचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. बदलत्या जागतिक परिस्थितीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी करणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे व्यापक दृष्टी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधींची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. अझरुद्दीन यांच्या मते, आजच्या युवकांनी स्थानिक प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही अभ्यास करून ज्ञानाच्या नव्या क्षितिजांकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. शिक्षण, संशोधन, कौशल्य आणि जागतिक भान यांचा समन्वय साधल्यास विद्यार्थी अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनू शकतात, असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल मोरे होते. याप्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, पुणेचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे, संस्थेचे सचिव मा. पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ संजय अस्वले मा. शैलेंद्र गोस्वामी, डॉ. शैलेश वढेर आणि डॉ. सुयोग अमृतराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence (AI) च्या वापरामुळे मराठवाड्यातील तरुणांसाठी उद्योजकतेचे नवे दरवाजे खुले होत आहेत. स्थानिक समस्यांवर आधारित संशोधन आणि नवकल्पना यांना AI ची जोड मिळाल्यास ‘Idea ते Startup’ हा
मराठवाड्यात उद्योजक घडतील असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष मा यशवंत शितोळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी मा. शैलेंद्र गोस्वामी यांनी “संशोधन आराखड्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका” या विषयावर बीजभाषण करताना आधुनिक संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत प्रभावी साधन ठरत असल्याचे सांगितले. संशोधन विषय निवड, समस्या मांडणी, संदर्भ साहित्याचा अभ्यास, माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष मांडणी यांसारख्या विविध टप्प्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी उपयोग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुयोग अमृतराव सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. दुसऱ्या सत्रात नांदेड येथील डॉ. शैलेश वधेर यांनी “संशोधन पद्धतीशास्त्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर सविस्तर विवेचन करत संशोधनातील माहिती संकलन, वर्गीकरण, विश्लेषण आणि निष्कर्ष मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशी उपयुक्त ठरते, याची माहिती दिली. युद्धांचा उद्योग, व्यापार चौथ्या सत्रात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि ENSIN फोरम पुणे चे संचालक मा. संजय जगताप यांनी आयडिया थाॅन ,इनोवेशन आणि स्टार्टअप या विषयावर मार्गदर्शन करत युवकांनी नोकरीच्या संधींबरोबरच उद्योजकतेच्या नव्या वाटाही स्वीकारल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. या राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश मधून 367 प्राध्यापक संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. विनोद देवकर यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. आभार कार्यशाळेचे संयोजक डॉ. अजित आष्टे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य पद्माकर पिठले, प्रा. जी. एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी यांची उपस्थिती होती
या कार्यशाळेसाठी डॉ विनोद देवरकर, डॉ. ए एस पदमपल्ले, डॉ. व्ही एस सूर्यवंशी, डॉ डी बी ढोबळे, डॉ. डी व्ही बोंदर, डॉ. एस एस रेवते, खंडू मुरळीकर, डॉ. विजय मुळे, ओमप्रकाश पवार, विद्या गायकवाड, अक्षदा बिराजदार संध्याराणी चौगुले आदींनी पुढाकार घेतला.