Best News Portal Development Company In India

तथागत भगवान बुद्धांनी जगाला कल्याणाचा शांतीचा व उन्नतीचा सन्मार्ग दिला _ धम्मचारी जिनोदय कळंब!

तथागत भगवान बुद्धांनी जगाला कल्याणाचा शांतीचा व उन्नतीचा सन्मार्ग दिला
_ धम्मचारी जिनोदय कळंब.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव

त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूरच्या वतीने तथागत भगवान बुद्ध जयंती दि.३रोजी अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्या निमित्ताने धम्मप्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
धम्मचारी जिनोदय यांनी अतिशय सुंदर व प्रभावीपणे सिद्धार्थ गौतम ते सम्यक संबुद्ध कसे झाले? हा खूप श्रवणीय इतिहास सांगून मंत्रमुग्ध केले.तथागत भगवान बुद्धांची वाणी मानवी व समस्त प्राणिमात्राच्या उन्नतीची आहे. तथागत बुद्धांनी सांगितलेले चार आर्य सत्य,पंचशील व आर्य अष्टांगिक मार्ग याविषयी सविस्तरपणे अभ्यासपूर्ण माहिती दिली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून व संविधानिक अधिकारामुळे आपली खूप चांगली प्रगती झाली आहे. अशाप्रकारचे सुंदर उपदेश सांगून पूर्वी, आज व भविष्यात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जगाला नितांत गरज आहे. असे सांगितले.

कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन धम्ममित्र अशोक कांबळे यांनी केले.धम्मचारी जिनोदय यांचा सत्कार धम्माचारी कल्याणदसी यांनी केला. परिचय धम्ममित्र मनोज सूर्यवंशी यांनी करून दिला. पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पल्लवी कीर्तीकर, शीतल सूर्यवंशी, धम्ममित्र वैभव कीर्तीकर व मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.अजनीकर साहेब, डॉ. भूषण दरकासे, प्रकाश तात्या सावनगिरकर,ओहळ सर व ताई, धम्ममित्र मीनाताई कीर्तीकर, धम्ममित्र संकेत बनसोडे तसेच धम्मबंधु, भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण लातूर टीम, धम्ममित्र सहदेव काका व मावशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. धम्ममित्र जालिंदर कांबळे व परिवाराने दानपेटीतील १२०० रुपये दान लातूर केंद्राला दिले त्याचबरोबर भोजनदान आशालता जालिंदर कांबळे व परिवारकडून देण्यात आले. शेवटी आभार धम्म मित्र जालिंदर कांबळे यांनी मानून धम्मपालन गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india