तुळजापूरच्या पावन नगरीत दहशतीचा कडेलोट ;
आणखी एका युवकावरती जीवघेणा हल्ला,
सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली !
तुळजापूर प्रतिनिधी:-तुळजापूर शहरात खून, चोऱ्या, दरोडे, मारामारी, फसवणूक आणि दहशत
सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ रोज पोटापाण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या तुळजापूरच्या जनतेच्या मनात आता भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे-अनोज कोरडे, अमोल कोरडे, दोघे रा. हाडको तुळजापूर, जोतीराम जाधव, रा. तुळजापूर खुर्द मनोज कांबळे, रा. हाडको तुळजापूर यांनी दि.06.05.2026 रोजी 22.30 वा. सु. जि.प.कन्या प्र.शाळे आवारात बाजार कट्टाचे बाजूस कट्यावर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-पार्थ शशिकांत कराडे, वय 24 वर्षे, रा. आर्य चौक तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टील करवत, एक बाजुला धार असलेले लाकडी मुठ असलेले हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पार्थ कराडे यांनी दि.08.05.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाणे करत आहे.
सदरील घटनेवरून एवढे लक्षात येते की गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही मध्यंतरीच्या काळात नको तेवढे गुन्हे घडले आहेत. खुणाची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना आपल्याला काय सुचवते आहे? कोण कुठला राग कधी काढेल हे सांगताच येईना. धाराशिव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कधी होणार आहे. हा या जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर समोर येऊन कोणीही द्यायला तयार नाही. तुळजापूरच्या शांत आणि संयमी नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलावीत असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.






