धडाकेबाज नियुक्ती: धाराशिव जिल्हाध्यक्षपदी महेश जाधव; राज ठाकरेंचे थेट आदेश!
तुळजापूर प्रतिनिधी :- तरुण, तडफदार, आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी काळातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि धाराशिव ग्रामीण भागाचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. महेश जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम संघटनेत पूर्ण निष्ठेने राबवणे सामान्य जनतेला न्याय देणे, पक्षाची प्रतिमा उंचावणे, कार्यकर्त्यात सुसंवाद राखणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धाराशिव जिल्ह्यात वज्रमुठ बांधून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याची जबाबदारी श्री महेश जाधव यांच्या खांद्यावर राहील.
कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
तुमच्या किंवा तुमच्या सहकाऱ्यांच्या वागणुकीमुळे समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव किंवा त्रास होणार नाही, अशाच प्रकारे वर्तन ठेवण्याची सक्त अपेक्षा व्यक्त केली आहे.
”मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी महेश जाधव यांना त्यांच्या भावी वाटचालीस व कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महेश जाधव यांच्या या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील मनसेची ताकद वाढणार का आणि आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







