तुळजापूर तालुक्यात अमृतवाडी शेतकऱ्याची न्यायासाठी कळकळीची याचना
जमिनीच्या वादात कोर्टाची दिशाभूल? वयोवृद्ध आईच्या जीवाला धोका असल्याची तक्रार
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यात अमृतवाडी
येथील शेतकरी अप्पाराव अशोक साळवे यांच्या बागाईत वडलोपार्लेत जमीन तुळजापूर–बार्शी रोडलगत सर्वे नं. १४९ मधील जमीन वादाला तोंड फुटले असून या प्रकरणात कोर्टाची दिशाभूल करून तात्पुरता फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप साळवे यांनी केला आहे.
साळवे यांच्या म्हणण्यानुसार, सुनील नागनाथ पलंगे यांनी संबंधित जमीन बालाजी बिभीषण मुळूक, गणेश बिभीषण मुळूक आणि नागेश बिभीषण मुळूक यांना चुकीची कागदपत्रे दाखवून विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू असतानाच दिशाभूल करून तात्पुरता निकाल त्यांच्या बाजूने लागू करण्यात आल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अप्पाराव साळवे हे व्यावसायिक ड्रायव्हर असून ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे–उज्जैन या मार्गावर गाडीसह प्रवासात होते. त्या दिवशी ते शहरात नसताना तुळजापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ही बाब त्यांच्या वकिलांनाच उशिरा समजल्याने साळवे यांनी संताप व्यक्त केला आहे.
साळवे यांनी सांगितले की, ते सतत गाड्यांच्या कामानिमित्त बाहेर असतात, तर घरी वयोवृद्ध आई शेती पाहते. जमीन विवादामुळे आईच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तातडीने तपास करून योग्य ती कार्यवाही करावी, तसेच निर्दोष शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी कळकळीची विनंती साळवे यांनी केली आहे.






