पत्रकारामुळेच गावाला सन्मान: गजेंद्र कदम
जळकोट, ( अरुण लोखंडे) गावच्या विकासामध्ये पत्रकारांच्या सकारात्मक लेखणीमुळे मी काम करत गेलो. कामाची व्यापकता वाढून काम करत गेल्याने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला. याचे सर्व श्रेय पत्रकारांना जाते. पत्रकारामुळेच गावाला सन्मान मिळाला. असे गौरवउद्गार जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम काढले.
जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सरपंच गजेंद्र कदम यांना सरपंच सेवा संघाचा अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी गजेंद्र कदम हे बोलत होते. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मेघराज किलजे, वीरभद्र पिसे, अरुण लोखंडे, विजय पिसे, संजय पिसे, विश्वास भोगे, जेवळीचे पत्रकार बसवराज होनाजे या पत्रकारांचा तर पत्रकारांचे म्हणून प्रतिनिधी म्हणून वामन कदम, महादेव कलशेट्टी यांचा फेटा,शाल व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील, विद्यार्थी सेवा प्रकाशनचे संचालक व जळकोटचे समाजसेवक भीमाशंकर हासुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, उबाठा सेनेचे तालुका संघटक कृष्णात मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत कदम, उबाठा सेनेचे अनिल छत्रे,ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चूंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी आदि उपस्थित होते.






