महाराष्ट्र लोकविकास मंच राष्ट्रीय युवक कार्यकारिणी ची तालुक्यातील व्रक्ष तोड थांबविण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सादर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
(भाग .२)
सदरील व्रत असे की,उमरगा येथिल राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या महाराष्ट् लोकविकास मंच राष्ट्रीय युवक कार्यकरणी या संघटनेचे पादाधिधिकारी यांनी उमरगा येथील वनपरिक्षेत्र मंडळ यांच्या अशिर्वादाने अमाप अवैध व्रक्ष तोडी होत असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदना द्वारे कळविले असुन दिलेल्या निवेदनावर असे नमुद करण्यात आले आहे की,उमरगा तालुक्यातील अवैध व्रक्ष तोड बेकायदेशीर लाकुड वाहतूक व घरगुती गँस तुटवडा याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागात सद्या गँसतुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिक चुलीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करत आहेत.
त्यामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये अंबा,चिंच, जांबुळ, बोर,अदि झाडांची विना परवाना मोठ्या प्रमाणावर व्रक्ष तोड सुरू आहे हि अवैध व्रक्ष तोड खुले आम सुरु असुन संबंधित विभागाकडून त्यावर प्रभावी नियंत्रण दिसुन येत नाही.
तसेच लाकुड व्यापाऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर लाकडाची वाहतूक केली जात आसुन चेकपोस्ट टाळून ईतर मार्गाचा वापर केला जात आहे काही लाकुड उमरगा येथील औध्योगीक वसाहतीत बाँयलरसाठी पुरवठा होत असल्याची माहिती मिळत आहे या सर्व प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघाड असचन वन्य जिवाचे अधिवास नष्ट होत आहेत.
परिणामी वन्य प्राणी गावाकडे वळून नागरीकांना त्रास देत आहेत.उमरगा येथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अस्तित्वात असतानाही या गंभीर बाबीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकामध्ये तिव्र नाराजी केली जात आहे.
असे उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र लोकविकास मंच राष्ट्रीय कार्यकारिणी ने नमुद केले आहे.
ददिलेल्या निवेदनावर निखिल भूमिपुत्र वाघ,(राष्ट्रीय सचिव,) उमेश शेषराव अबाचने,संकेत श्रीमंत लवटे,विजय व्यंकट टाकळे,अक्षय गोविंद टाकले,अदिंच्या स्वाक्षरी करण्यात आली आहे.
चौकट ( वनपरिक्षेत्र कर्यालयाच्या जबाबदार अधिकारी यांच्या अशिर्वादाने तालुक्यातील अवैध लाकुडतोडीमुळे शेतशिवारात फळझाडासह चंदन या झाडाचा नायनाट झाला आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सह ,पालकमंत्री धाराशिव ,जिल्हा प्रशासनाने लाकुडतोडीस वेळीच आळा घालण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी जनतेची मागणी जोर धरत आहे.)






