परीवर्तन चे मारुती बनसोडे यांना “अंबरनाथ गौरव” पुरस्काराने सन्मानित
————————————————–
नळदुर्ग (एस. के.गायकवाड) : परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर चे संस्थापक सचिव तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त मारुती बनसोडे यांना यावर्षीचा दैनिक अंबरनाथ टाईम्स कडून दिला जाणारा अंबरनाथ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.
. मारुती बनसोडे हे मूळचे बोरगाव ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव ची स्थापना १९९६ मध्ये केली त्या संस्थेकडून गेली ३० वर्षे काम करीत आहेत. पोतराज प्रथा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, पाणी,ग्रामविकास, विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांच्या प्रश्नावर ही ते काम करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक अंबरनाथ टाइम्स कडून दिला जाणारा सन 2025 -26 चा “अंबरनाथ गौरव”पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
सदर पुरस्कारचे वितरण दि.23 मे 2026 रोजी अंबरनाथ येथे एका मोठ्या कार्यक्रमात करण्यात आले. या प्रसंगी आमदार किशन शेट कथोरे 🎂यांच्या हस्ते तर दैनिक अंबरनाथ टाईम चे मुख्य संपादक कमलाकर सूर्यवंशी, कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी,उपसंपादक बालाजी सुर्यवंशी सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मारुती बनसोडे हे मूळचे बोरगाव (तुपाचे) ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत.गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव ची स्थापना १९९६ मध्ये केली त्या संस्थेकडून गेली ३० वर्षे काम करीत आहेत.पोतराज प्रथा निर्मूलन,व्यसनमुक्ती,पर्यावरण, पाणी,ग्रामविकास, विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांच्या प्रश्नावर ही ते काम करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक अंबरनाथ टाइम्स कडून दिला जाणारा सन 2025 -26 चा “अंबरनाथ गौरव ” पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
. सदर पुस्कारचे वितरण दि.23 मे 2026 रोजी अंबरनाथ येथे एका मोठ्या कार्यक्रमात करण़्यात आले. या प्रसंगी आमदार किशन शेट कथोरे यांच्या हस्ते तर दैनिक अंबरनाथ टाईम चे मुख्य संपादक कमलाकर सूर्यवंशी, कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी, उपसंपादक बालाजी सुर्यवंशी सह मंचकावर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.






