*वर्षावास निमित्त पंचशील नगर येथे बैठक संपन्न* दि. १९ उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा शहरातील पंचशील नगर येथी़ल नालंदा बुद्ध विहार येथे वर्षावासा निमित्त भारतीय बौद्ध महासभा यांची बैठक संपन्न. भारतीय बौद्ध महासभा संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वगतीने चालत असलेल्या धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत भगवान बुद्धांपासून चालू असलेली वर्षावास परंपरा या वर्षावासातून संस्कार रुजवण्याचे कार्य करण्यासाठी नालंदा बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून नालंदा बुद्ध विहार येथे दिनांक २९ जुलैपासून २६ ऑक्टोबर पर्यंत वर्षावास कार्यक्रम ३२ विषयासह संपन्न होणार आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे बोलत असताना म्हणाली की, भगवान बुद्धांनी दिलेला धम्म आपण जर आपल्या आचरणामध्ये आणला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही भगवान बुद्धाने आपलं राजवैभव सोडून जगातील नागरिकांच्या कल्याणासाठी तपश्चर्या केली व दुःखाचे मुख्य कारण शोधून त्यावरती उपायोजना सांगितले. त्यामुळे जगातील संपूर्ण नागरिक हे युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आहे असे म्हणत आहेत त्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुध्द धम्म सघ हा अंगीकारला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये व येणाऱ्या पिढीसाठी यशस्वी झालो असं समजायला काही चुकीचं वाटणार नाही. समाजातील रूढी परंपरा अनिष्ट प्रथा या बाजूला सरून बुद्ध धम्माचा स्वीकार करून धम्माचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारला तर आपली येणारी पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जीवन जगणारी पिढी निर्माण होईल त्यासाठी २९ जुलैपासून वर्षावासासाठी आपण सर्वजण उपस्थित रहाल व बुद्ध धम्म आचरणात अनाल अशी अपेक्षा बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी उपस्थित नागरिका कडून व्यक्त केली. या वेळी भारतीय बौध्द महासभा या सस्थे विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या वेळी संगीताताई सोनकांबळे, कवी दिगंबर भालेराव यांनी आपले मत व्यक्त केले. या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बोध्दाचार्य उमेश सुरवसे, तालुका सरचिटणीस संगीता सोनकांबळे, तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रा. शिवराम अडसुळे, तालुका उपाध्यक्ष महिला विभाग रेखा काबळे, तालुका सचिव धीरज कांबळे, तालुका सचिव उषाताई गायकवाड, तालुका संघटक बालाजी तालुका सचिव मिलिंद कांबळे, तालुका संघटक सुरज गायकवाड, तसेच नालंदा बुद्ध विहार येथील कवी गुणरत्न दिगंबर भालेराव, वर्षा कांबळे सुवर्णा कांबळे,लक्ष्मी कांबळे, पुष्पा कांबळे,अंजना भालेराव, मंगल भालेराव, मंगल गायकवाड, संगीता कांबळे, सुवर्णा भालेराव, आशा वंताळकर,अनुसया कांबळे, केशर वंताळकर,अर्चना गायकवाड, नीलम व्हताळकर, रेणुका सूर्यवंशी,प्रणिता गायकवाड,संगीता गायकवाड, राजश्री कांबळे लक्ष्मी भालेराव आवेदा कांबळे,रेखा भाले , सीमा कांबळे गीता सूर्यवंशी,पार्वती कांबळे छबा गवळी, रुक्मिणी व्हताळकर,शेषाबाई सूर्यवंशी, गुलाब गोरोबा कांबळे,पुष्पा गायकवाड,वर्षा गायकवाड, आदी सर्व नालंदा बुद्ध विहार येथील सर्व पंचशील नगर मधील नागरिक उपस्थित होते.या बैठकीचे सुत्रसचालन धिरज काबळे यानी केले तर आभार प्रा. शिवराम आडसुळे यांनी मानले.







