Best News Portal Development Company In India

जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर नाहक लाठी चार्ज करणाऱ्या सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नळदुर्ग येथील महाराष्ट्र बंद आंदोलनात मागणी!

जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर नाहक लाठी चार्ज करणाऱ्या सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नळदुर्ग येथील महाराष्ट्र बंद आंदोलनात मागणी
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
वैद्यकीय प्रवेश पुर्व परीक्षा नीट या परीक्षेचा पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यानी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जंतर मंतर दिल्ली येथे सनदशिर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नाहक लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या अनुसंघाने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात नळदुर्ग बंदचे अवाहन करून रास्ता रोको करून जाहीर जाहीर निषेध सभा घेण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना नेते कमलाकर काका चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यावर झालेल्या बेचुट लाठी चार्ज ची जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी सरकारने राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली.
. नीट परीक्षेचा पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा नरेंद्र मोदी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके व संशोधक सोनम वांगचुक जंतर मंतर दिल्ली येथे उपोषण आंदोलन सुरू केले होते या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी देशातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रचंड मोर्चा काढला हा मोर्चा दडपून टाकण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पोलीस बळाचा वापर करून विद्यार्थ्यावर नाहक अश्रुधुराचा मारा करून लाठीचार्ज केला ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अँड.प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या अनुसंघाने वंचित बहुजन आघाडी,महाविकास आघाडी यांच्यासह समविचारी पक्ष कार्यकर्त्यांनी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानका समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करून नळदुर्ग बंद आवहान केले व सत्ताधारी सरकारचा जाहीर निषेध केला या बंदला नळदुर्ग येथील व्यापाऱ्याने आपली दुकाने बंद करून सहकार्य केले.
याप्रसंगी बोलताना शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) चे धाराशिव जिल्हा नेते कमलाकर काका चव्हाण म्हणाले की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रज सरकारकडून पारतंत्र्याच्या काळात जालियनवाला बाग सत्याग्रहात स्वातंत्र्य ची मागणी करणाऱ्या भारतीय क्रांतिवीरावर इंग्रज सरकारकडून ज्या प्रकारे लाठी चार्च करण्यात आला होता. त्याच प्रकारे गुजरातचे व्यापारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारकडून स्वातंत्र्याच्या काळात सनदशिर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी सरकारनेच राजीनामा द्यावा.अशी जोरदार मागणी या प्रसंगी कमलाकर काका सह आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अंकुश लोखंडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष विनोद भंडारे,भीम कन्या स्नेहा झेंडारे,राष्ट्रीय काँग्रेस चे नगर सेवक इमाम शेख,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे युवा कार्यकर्ते ताजो दीन शेख,शिवसेना (उबाठा) चे नळदुर्ग शहराध्यक्ष संतोष पुदाले रिपाइं चे बाबासाहेब बनसोडे अरुण लोखंडे एस. के.गायकवाड आदींची ही सरकारच्या निषेधार्थ भाषणे झाली.
. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india