*बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होण्यासाठी आपण आचरणशिल असणे गरजेचे आहे – बौद्धाचार्य उमेश सुरवसे* उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव. दि.२६.बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होण्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत घेण्यात येणारी २४ प्रशिक्षण शिबिरे परिपूर्ण करणे तसेच त्याचे आचरण करणे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होणे होय असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे दिनांक २५जुलै २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आयोजित भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा निर्माणासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा स्थापना तसेच वर्षावास कार्यक्रमानिमित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीला भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितानी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष शिवदास कांबळे हे होते, तर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्या रुक्मिणी ताई कांबळे,संगीता सोनकांबळे, उषा गायकवाड प्रा शिवराम आडसुळे, बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला केंद्र उमरगा यांचे उपाध्यक्ष पत्रकार दिलीप सुरवसे, मिलिंद कांबळे बालाजी गायकवाड कीर्ती कुमार गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलत असताना बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, आपण सर्वजण भारतीय बौद्ध महासभा या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ग्रामशाखीची स्थापना करण्यासाठी तसेच वर्षावास कार्यक्रम यशस्वी राबवण्यासाठी एकत्रित आलो आहोत त्याचबरोबर आपण सर्वजण आचरणशील असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण बौद्ध उपासक किंवा उपासीका होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र अलीकडील काळामध्ये सर्वजण बौद्ध उपासक उपासिका हा शब्द प्रयोग करत असल्यामुळे यामध्ये बुद्धचरणशील कोण आहे यामध्ये फरक दिसत नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी सांगितले. आपण सर्वजण सरास उपासक उपासिका असे शब्दप्रयोग अनेक कार्यक्रमातून करत आहोत तसेच लग्न पत्रिका मध्ये छापत असतानाही उपासक उपासिका हा शब्दप्रयोग केला जात आहे मात्र उपासक म्हणजे नेमकं कोण हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा टाकलेला आहे उपासक म्हणजे जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आहे,जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले त्रिशरण पंचशील आहे,जो कोणी या त्रिशरण पंचशीलाचे पालन करतो तो उपासक आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मत बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी व्यक्त केले.जे लोक त्रिसरण पंचशीलाचे पालन करत नाहीत त्यांना उपासक म्हणण्याची तसदी आपण घेऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. भगवान बुद्धापासून चालू असलेली वर्षावासाची परंपरा भारतीय बौद्ध महासभेने चालू ठेवलेली आहे त्यासाठी कवठा ग्रामस्थांनी वर्षावास कार्यक्रम राबवून आचरण सिल व्हावे तसेच भारतीय बौद्ध महासभेची ग्रामशाखांकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याची एकनिष्ठ राहावे व आंबेडकर घराण्याचा वारसदार म्हणून आपण ग्राम शाखेच्या माध्यमातून त्यांच्या आदेशाचे पालन करावे असेही बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी बोलत असताना सांगितले व भारतीय बौद्ध महासभा वर्षावास याविषयी सविस्तर आणि सखोल असे मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे ठराव घेण्यात आले यामध्ये भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा स्थापन करणे, वर्षावास कार्यक्रम यशस्वी राबवणे, तसेच सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवणे व महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविणे ज्यामधून महिलांना प्रोत्साहन मिळेल आसे उपक्रम राबवणे असे ठराव घेण्यात आले. तर महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षा म्हणून गीता कांबळे यांचे बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कांताबाई कांबळे, शिवकन्या विनोद कांबळे,जयश्री कांबळे,जिजाबाई कांबळे,शारदा सुरवसे,शोभा सुरवसे,नंदा कांबळे,सुनंदा कांबळे,शिवानी कांबळे,लक्ष्मी कांबळे,सुप्रिया गायकवाड,श्रीदेवी सुरवसे, भागिरथी सुरवसे,,मीराबाई कांबळे, कलिंदा कांबळे, रूपा बनसोडे,विजाबाई सुरवसे, निर्मलाबाई सुरवसे, शाळू कांबळे,
रंजना कांबळे,रुक्मिणीबाई कांबळे,वैजयंता कांबळे,
विठाबाई कांबळे,गयाबाई कांबळे,लोचनाबाई कांबळे
केशरबाई कांबळे,संपता कांबळे,कावेरी सुरवसे , माजी ग्रामपंचायत सदस्य पंडित कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कांबळे, लाईनमन बाळू कांबळे, तसेच सर्व भीमनगर येथील सर्व वधूपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन पत्रकार दिलीप सुरवसे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप शिवदास कांबळे यांनी केले.







