Best News Portal Development Company In India

मुसळधार पावसातही भीमसैनिकांचा उत्साह उधाणला; जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे (दादा)यांच्याकडून धाराशिवच्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार!

मुसळधार पावसातही भीमसैनिकांचा उत्साह उधाणला; जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे (दादा)यांच्याकडून धाराशिवच्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार!
​तुळजापूर प्रतिनिधी:-S C अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी कृती समिती धाराशिव जिल्हातील आलेल्या सर्व विविध पक्ष संघटनांच्या भिमअनुयांचे हाजोच्या संखेने मोर्चास सहभाग नोंदवीला व मोर्चा यशस्ची केल्या त्या बद्दल सर्वांचे मनापासुन आभार जयभिम जय संविधान. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद(दादा) बनसोडे यांनी जिल्ह्यात पडणाऱ्या तुफान पावसातही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
​गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, या प्रतिकूल हवामानाची आणि तुफान पावसाची तमा न बाळगता जिल्ह्यातील भीमसैनिकांनी दाखवलेली निष्ठा आणि उपस्थिती अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे.
​या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विद्यानंद(दादा) बनसोडे म्हणाले:
​”पावसाचे सावट कितीही मोठे असले तरी भीमसैनिकांचा विचार आणि निष्ठा त्याहून अधिक भक्कम आहे. या तुफान पावसातही उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक निष्ठावंत भीमसैनिकाचा मला अभिमान आहे. तुमचा हाच उत्साह पक्षाला नवी ताकद देणारा आहे.”
​धाराशिव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या पावसातही आपली उपस्थिती दर्शवत पक्षाप्रती असलेली कटिबद्धता सिद्ध केली आहे. याबद्दल विद्यानंद(दादा) बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानत भविष्यातही असाच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india