मानवी जीवनाचे वास्तव्य चित्र अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडले:एस.के.गायकवाड
————————————————–
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
उपेक्षित कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या व्यथा आणि वेदनांचा ठाव घेणारे मानवी जीवनाचे वास्तव चित्र साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडले असून सर्वसामान्य गोरगरिबांच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्यातून जगासमोर आणले आहे.त्यांचे साहित्य केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारणारे नसून ते मानवी जीवनाचे वास्तव सांगणारे आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीतून सर्व साहित्यिकांना एक नवीन दिशा देण्याच काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेल आहे.आजही त्यांचे साहित्य प्रत्येक माणसाला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याकरिता प्रेरणा देते. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस. के. गायकवाड यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्तानेआभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.तेजाबाई मिटकर तर पाहुणे म्हणूनजे जेष्ठकार्य करते शिवाजी मिटकर गुरुजी,ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, सुरेखाताई भालचंद्र यादव, भाजपा मिडीया सेल तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची ही भाषणे झाली.
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अवचित साधून येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक तानाजी लोहार यानी कैले.या प्रसंगी प्रा. सचिन मिटकर, गणपत सुरवसे,रामसिंग परिहार,बाळू पवार,मोहन आप्पा सोमवंशी,चंद्रकांत वाघमारे,रमेश वाघमारे,मुख्याध्यापक बी.बी.सगर, सहशिक्ष डी. बी.अनपट सर,सहशिक्षिका एस.एस.मसे मॅडम अंगणवाडीच्या पद्मीनी पवार,रूपाली जाधव,जयंत उत्सव कमिटीचे बाळू कांबळे, शंकर आप्पा भंडारे,दत्तात्रय कांबळे,श्रेष्ठ कार्यकर्ते कृष्णा कांबळे, बाळू भंडारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







