Best News Portal Development Company In India

सध्याच्या धावपळीच्या युगात जगा आणि जगू द्या हा विचार अंगीकृत करून दानत्वाची भावना जोपासने काळाची गरज आहे : प्राचार्य डॉ.सुभाष राठोड!

सध्याच्या धावपळीच्या युगात जगा आणि जगू द्या हा विचार अंगीकृत करून दानत्वाची भावना जोपासने काळाची गरज आहे : प्राचार्य डॉ.सुभाष राठोड
————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
उंचा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर,
पंथी को छाँव नही,फल लागे अति दूर.
जर खजूराचे फळ कोणाला खाता येत नसेल तर खजूराचे झाड किती ही उंच असून काय उपयोग त्याची सावली ही मिळत नाही आणि फळ ही खाता येत नाही.तस ज्यांच्या कडे घडगंज संपत्ती आहे पण दानत्वाची भावना नाही तर त्याचा काय उपयोग हा संत कबिराच्या दोह्याचा दाखला देत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता. तुळजापूर चे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड म्हणाले की जगा आणि जगू द्या हा विचार अंगीकृत करून प्रत्येकाने दानत्वाची भावना जोपासणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन आपलं घर नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात प्राचार्य सुभाष राठोड यानी केले.
. हंगरगा (नळ) ता. तुळजापूर येथिल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे आणि कांबळे परिवाराच्या वतीने त्यांचे पिताश्री स्मृतीशेष धुळप्पा सायबा कांबळे यांच्या १५ व्या स्मृती दिनानिमित्ताने दि.०५ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रसेवा दल संचलित आपलं घर नळदुर्ग येथील बालक आश्रमातील सभाग्रहात आदरांजली सभा,अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व भोजनदान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य डॉ.सुभाष राठोड बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिदिन येथील अनाथ मुलांबरोबर संपन्न करून दानत्वाची भावना दाखवली हा एक स्तूत असा उपक्रम असून समाजाला एक नवी दिशा देणारा प्रेरणादायी असा उपक्रम आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.सुहास राठोड प्राध्यापक डॉ.उद्धव भाले, डॉ.पी.एस.गायकवाड,
डॉ.दयानंद भवाळ,हंगरगा (नळ) येथील सरपंच अतुल कलशेट्टी,उपसरपंच दयानंद चौघुले,प्रविण चौघुले, चंद्रकांत जाधव,दिलीप पाटील,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड,तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,आदी उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कालथित धुळाप्पा सायबा कांबळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी डॉ.उद्धव भाले,सरपंच अतुल कलशेट्टी, दिलीप पाटील, रिपाइंचे एस के गायकवाड आदींची ही अदरांजली पर भाषणे झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं (आठवले) चे तालुका अध्यस अरुण लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद भंडारे यांनी केले व आभार प्रदर्शन बाबासाहेब कांबळे यांनी केले.यावेळी डॉ.हंसराज जाधव,नगर सेवक तथा न.प. चे विरोधी पक्ष गट नेते मारूती खारवे,बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे,याकुब शेख,माजी सैनिक मधुकर कांबळे, मसाजी गायकवाड, अतुल बनसोडे,रमेश सर्जे, दिनेश पुराले,सचिन गायकवाड,बलभिम कांबळे, दिनकर कांबळे,दत्तात्रय कांबळे,राजेंद्र शिंदे,मातोश्री रमाबाई काबळे,भाग्यश्री कांबळे,जयश्री कांबळे, उर्मिला कांबळे, त्रिशला कांबळे,कांताबाई कांबळे सह विद्यार्थी कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india