Best News Portal Development Company In India

कालकथित गौतम भाऊ वाघमारे यांना भावपूर्ण आदरांजली!

कालकथित गौतम भाऊ वाघमारे यांना भावपूर्ण आदरांजली
————————————————-
सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते दूरसंचार विभाग पुणे येथून कनिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले वागदरी ता.तुळजापूर येथील सुपूत्र गौतम सिताराम वाघमारे अर्थात आपल्या सर्वांचे आदरणीय गौतम भाऊ यांचे दि.८ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.३० वा. दरम्यान पुणे येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले आहे.ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक अशी घटना आहे.
दिवंगत गौतम वाघमारे साहेब यांचा बालाघाट पर्वतरांगेच्या कुसळी माळरानात वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील वागदरी येते त्यांचा जन्म झाला.आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करून संचार विभागातील डिप्लोमा संपादन करून भारतीय दूरसंचार विभागात पुणे येथे नोकरी मिळवली. नोकरीच्या निमित्ताने ते पुणे येथे घोरपडी या ठिकाणी स्थायिक झाले. बरीच वर्ष पुणे येथे नोकरी करत करत मध्यंतरीच्या काळात उमरगा, उस्मानाबाद या ठिकाणी काही काळ या भागात नोकरी केली.नोकरी करत करत त्यांचे लक्ष सर्वत्र होते. गावाकडे सर्व लहान थोर मंडळीची अंतकरणातून विचारपुस करत असत. गावाकडे होणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात,सुख दुःखाच्या कार्यक्रमात त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहायचा. चांगल्या पगाराची नोकरी असून कधी त्यानी गर्व केला नाही अहंकार केला नाही सर्व लहान थोर मंडळींशी नातेवाईकाशी अत्यंत माणूसकीने वागायचे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा त्यांना फार मोठा अभिमान असायचा. वादगरी येथील तरुणानी पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सत्यशिल सामाजिक संस्थेत ते सक्रिय सदस्य होते. सत्यशील सामाजिक संस्था व वागदरी गाव परिवार या व्हाट्सअप ग्रुप वर सातत्याने ते अत्यंत सुंदर सुंदर मानवतावादी विचार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयीचे विचार पाठवत असत. असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी त्यांनी असा एखादा सुंदर विचार पाठवला नाही. शिवाय ग्रुप मधील जर कोणी एकदा चांगला विचार पाठवला असेल किंवा एखादा उपक्रमाची बातमी त्यांना ग्रुपमधून कळाली की लगेच त्यांचा रिप्लाय असायचा अभिनंदन करायचे कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेल आहे.
अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ असे व्यक्तिमत्व त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी दुःखद असी ही घटना आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण आदरांली

शोकाकुल
एस.के. गायकवाड रिपाइं (आठवले ) धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार मु.पो.वागदरी ता. तुळजापूर

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india