क्षय रोग ( टी.बी.) मुक्त भारत आभियानात आयुष्यमान आरोग्य मंदिर
(अरोग्य उप केंद्र) शहापूर अंतर्गत असलेल्या तिन ग्रामपंचायतींना सिल्वर पदक तर एका ग्रामपंचायतिला ताम्र पदकाने सन्मानित करण्यात आले.
————————————————
नळदुर्ग (एस. के.गायकवाड) :
टी.बी. मुक्त भारत अभियानात तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरांतर्गत येणाऱ्या वागदरी,दहिटणा,आणि गुळहळ्ळी या तीन ग्रामपंचायतींना सिल्व्हर पदकाने तर गुजनूर ग्राम पंचायतिला ब्रांझ पदकाने सन्मानित करण्यात आले.
. टी.बी.मुक्त भारत अभियान – २०२५ अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता यामध्ये शहापूर आयुष्यमान आरोग्य मंदिरा अंतर्गत येणाऱ्या वागदरी, दहिटणा, गुळहळ्ळी व गुजनूर या चार ग्रामपंचायतीचा समावेश होता. या चार ही ग्रामपंचायत मध्ये आरोग्य समुपदेशक म्हणून डॉक्टर यशवंत नरवडे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सरपंच उपसरपंच व ग्रा.प.सदस्य यांच्या सहकार्याने वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी प्रथमोपचार,आरोग्य सल्ला शिबिर, ग्राम स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविले. येथील ग्रामस्थांचे रक्तदाब मधुमेह व अन्य तपासण्या त्यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले त्यामुळे वागदरी,दहिटणा व गुळहळळी व गुजनूर या ठिकाणी टी.बी.मुक्त गाव अभियान हे यशस्वीरित्या राबविण्यात आले. नुकतच या अभियानाचे मूल्यांकन झाले असून या अभियानात वागदरी,गुळहळळी व दहिटणा या गावांना सिल्वर पदक तर गुजनूर गावाला ब्रांझ पदक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दि.१२ऑगस्ट २o२६ रोजी तुळजापूर तालुक्यातील “टी बी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा २०२५” हा पुरस्कार वितरणाचा दिमाखदार कार्यक्रम पंचायत समिती येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ५३ ग्रामपंचायतीना आपला गाव टीबी मुक्त केल्याबद्दल रौप्य पदकाने व २२ ग्रामपंचायतीना ताम्र पदकाने पदकाने गौरवण्यात आले.
तालुक्यातील एक ग्रामपंचायत हगलूर सुवर्ण पदकास पात्र असून त्यांना जिल्हा स्तरावर बोलावून
लककरचं गौरवण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा व पुष्पगुच्छ असे आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख हे होते तर प्रमुख पाहूणे उपसभापती रोहिणीताई मेलगिरी,गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख, जि.प.सदस्य दयानंद शिंदे, पंचायत समिती सदस्य किसन देडे,वैभव मरडे उपस्थित होते.
या प्रसंगी कर्यक्रमांचे प्रस्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार यांनी केले.
. या वेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.रमजानअली शेख, परिवेक्षक सुनिल उंडरे यांची ही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध गटाचे जि.प. सदस्य व गणाचे पंचायत समिती सदस्य, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत चे सरपंच तेजाबाई मिटकर, शिवकांता कांबळे, फुलचंद वाघमारे, तानाजी बंधिछरे सह तालूक्यातील सर्व सहभागी ग्रापचे सरपंच,उपसरपंच,व ग्रा.प.सदस्या सह संबंधित आरोग्य कर्मचारी आणि सर्व आशा कार्यकर्ती उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षयरोग पथक तुळजापूर चे पथक पर्यवेक्षक महेश पाठक,देविदास जाधव,पंचायत समिती कार्यालयाचे तीर्थकर आप्पा, गुरु बेद्रे,तालुका आरोग्य कार्यालयाचे,तानाजी क्षीरसागर,रामानंद भिसे,विनोद मोरे,विशाल माळी,शहाजी आवटे, प्रवीण आवले,शशी साळुंखे,अजय गायकवाड,सतीश सातपुते, सुरज ढेरे, दीपक माळी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







