Best News Portal Development Company In India

प्रत्येक कार्य हे ईश्वरासाआठी आहे; हे मनात रूजवाव .पं. शक्तिनंदन आर्य !

प्रत्येक कार्य हे ईश्वरासाआठी आहे; हे मनात रूजवाव
………पं. शक्तिनंदन आर्य
——————–
ईश्वर भक्ती, स्तुती, प्रार्थना, उपासना व जीवनातील अंतिम ध्येय समजून घेऊन कर्म केले जावे. कारण कर्माला फळं असतात ती ज्यांची आहेत त्यांनाच मिळतात. कर्म फळांची अदलाबदल होत नसते. असे प्रतिपादन वैदिक व्याख्याता पं. शक्तिनंदन आर्य यांनी सत्संग यादरम्यानच्या प्रवचनावेळी केले.

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा (आनंदीपूर) शहर येथे आर्य समाज मंदिरात पाच दिवसांच्या श्रावणी पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणी पर्वा निमित्त होम हवन / यज्ञ सत्संग व प्रवचन सप्ताह कार्यक्रम आणि भजन सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. सलग पाच दिवस चालू असलेल्या कार्यक्रमात सकाळी 8.30 ते 11.00 वाजेपर्यंत तर सायंकाळी 5.30 ते 8.30 यावेळेत सदरील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन गायन व निरूपण भजनोपदेशक पं.यशदेवजी हितैशी यांनी केले तसेच बरेली, उत्तर प्रदेश, पं. बुद्धदेवजी आर्य यांची संगीत वाद्यांची साथ लाभली. रामायण व महाभारतातील प्रसंगांना गीतगायनातून उभे केले. आपल्या जीवनातील अडचणीच्या वेळी आपल्या महाकाव्यातील कित्येक प्रसंग द्विधा मनःस्थितीतील आणि सुखदुःखानी भरलेली आहेत. योग्यवेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी शिदोरीचं काम करतात. ज्येष्ठांची आज्ञा, अनुपालन, उपदेश इत्यादी बाबींनी आपली संस्कृती संपन्न असल्याचे सांगितले. यावेळी मंत्री डॉ. विठ्ठलराव जाधव, प्रधानजी प्रदीपजी चालुक्य, कोषाध्यक्ष माधव माने, ॲड. गोविंदराव प्रदीप पाटील, अंजली पाटील, शिला मुदगडे, संतोषी माने, रागिणी दुधभाते यांच्यासह परिसरातील भक्तगण उपस्थित होते. या श्रावणी पर्वाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र वाले, दिगंबर घाटे, शिवाजी बुवा, प्रशांत चव्हाण, लखनसिंग ठाकूर, सुर्यकांत चौधरी, बाळासाहेब माने, विठ्ठल बिराजदार आदिंनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india