Best News Portal Development Company In India

उमरगा जनता सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा थाटामाटात संपन्न.

उमरगा जनता सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा थाटामाटात संपन्न.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा जनता सहकारी बॅकेला नविन इमारत उभारणीस पूर्वपरवानगी मिळाली असुन पुढील वर्षीची सभा बॅंकेच्याच सभागृहात होईल. बॅंकेकडे २४२ कोटींच्या ठेवी असुन चालु वर्षात ४०० कोटी देवीचे उद्दिष्ट पूर्ण करु. सभासदांना १६१ कोटीचे कर्ज वाटप करुन बँकेकडे २७१ कोटी खेळते भांडवल आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी १४ लाखाचा नफा मिळाला आहे. बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. सर्वसामान्यांचा विश्‍वास संपादन करुन बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन करून ऑडिट वर्ग मिळवल्याचे प्रतिपादन चेअरमन शरण पाटील यांनी केले.
उमरगा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२०) उमरगा येथे संपन्न झाली.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, रामकृष्णपंत खरोसेकर, विठ्ठलराव बदोले, उपाध्यक्ष ॲड. विरसंगप्पा आळंगे, ॲड. प्रदिप पणुरे, विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, बलभिम पाटील, केशव पवार, विजयकुमार सोनवणे, मल्लिनाथ दंडगे, संचालक डॉ. दिलीप गरुड, रफिक तांबोळी, ॲड. संजय बिराजदार, ॲड. प्रवीण पणुरे, भरत मारेकर, अण्णाराव कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग लड्डा आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार बसवराज पाटील यांची विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर घेण्यात आला. पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे. बँकेने खातेदारांच्या सोईकरिता सोने तारण, सोलार, वाहन, गृह, व्यवसाय, सुवर्ण अलंकार व सौर गृह प्रकाश योजना, मराठा तरुणांना आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज वाटप सुरु आहे. बॅकेच्या उमरगा, मुरुम, जेवळी, जळकोट, कासारशिरसी, सोलापूर व लातुर येथे शाखेतून क्यू आर. कोड, आय. एम. पी. एस., नॅच, एस एम एस, आरटीजीएस, एन ई एफ टी, कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध असुन युपीआय, गुगलपे, फोनपे ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन करून अ ऑडिट वर्ग मिळवत विश्‍वास संपादन केला आहे. बॅंकेकडे २४२ कोटींच्या ठेवी असुन चालु वर्षात ४०० कोटी ठेवीसह बॅकेला नविन इमारत उभारण्याची पूर्वपरवानगी मिळाली असुन पुढील वर्षीची सभा बॅंकेच्या सभागृहात होईल. सभासदांना १६१ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. खेळते भांडवल २७१ कोटी, गुंतवणूक १०८ कोटी असुन बॅकेला चालू आर्थिक वर्षात ५ कोटी १४ लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे. सभासदांच्या सहकार्याने बॅकेचे नेट एन. पी. ए. केवळ १.६९ टक्के असुन झिरो टक्के एनपीएचे उद्दिष्ट ठेवल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक, शाखाधिकारी, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हा. चेअरमन ॲड. व्ही. एस. आळंगे यांनी प्रास्ताविक करुन अहवाल वाचन केले. अंबिका माळी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. पुजा काळे यांनी सुत्रसंचलन केले तर संचालक भरत मारेकर यांनी आभार मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india