Best News Portal Development Company In India

भारतीय स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण स्थान – बौद्धाचार्य उमेश सुरवसे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण स्थान – बौद्धाचार्य उमेश सुरवसे.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२०) भारत देशातील नागरिकांना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे त्याचबरोबर भारत देशातील नागरिकाकडून देशातील नागरिका वरती होणाऱ्या अन्याय अत्याचार या स्वातंत्र्याच्या माध्यमातून नष्ट करण्यात यावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्या मिळवण्यासाठी महत्व पुर्ण स्थान होते असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे हे उमरगा येथील पंचशील नगर बुद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्त बोलत होते
.
वर्षावास कार्यक्रमाच्या २२व्या दिवसानिमित्त भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचक प्रा. एस सी गायकवाड, यांनी केले तर भारतीय बौद्ध महासभेने ठरवून दिलेल्या ३२ विषयांपैकी विषय बाबासाहेब आंबेडकर व भारतीय स्वातंत्र्य या विषयावरती भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य प्रवचनकार उमेश सुरवसे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हे असे गायकवाड यांनी गायकवाड बालाजी सूर्यवंशी तसेच सर्व बौद्ध उपासिका यांच्यावर हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आले तसेच त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा बुद्ध वंदना धम्मा वंदना संघ वंदना घेऊन प्रवचन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बोदाचार्य उमेश सुरवसे उपाध्यक्ष शिवराम आरसुळे सचिव धीरज कांबळे सचिव मिलिंद कांबळे संघटक सुरज गायकवाड आदींचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

पुढे बोलत असताना प्रवचनकार बौध्दाचार्य सुरवसे म्हणाले की,भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी येथील नागरिकांच्या समस्या व या नागरिकांना देण्यात येणारे स्वातंत्र्य कसे असावे यांना न्याय कसा मिळू शकतो यांना आपला अधिकार कोणत्या कलमाच्या आधारे मिळाला पाहिजे या सर्व बाबीचे निरीक्षण करून शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन या पक्षाच्या माध्यमातून १९४६ मध्ये या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून दिल्यामुळे भारतीय नागरिकांना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर नागरिकांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि कलम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कच्च्या मसुद्यामध्ये असल्याचे येथील महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांना ते महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४६ मध्ये संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये जोगेंद्र सहकार्याने मुस्लिम लीगच्या पाठिंब्यामुळे संविधान सभेमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र पश्चिम बंगालची फाळणी झाल्यामुळे ते रिक्त झाले. असल्यामुळे महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल यांच्या सहकार्याने डॉक्टर मुकुंद जयकर या काँग्रेसच्या मुंबई प्रांताच्या सदस्याचा राजीनामा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना त्या जागेवरती बिनविरोध निवड करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.

भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य मिळावे व ती स्वातंत्र्य कशा स्वरूपाचे असावे याचा आराखडा स्वातंत्र्य मिळण्या अगोदर तयार करणारे या देशातील महान युगपुरुष महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वपूर्ण वाटा आहे असे मत सुरवसे यांनी पंचशील नगर येथील बुद्ध विहारांमध्ये वर्षावास कार्यक्रमानिमित्त बोलत असताना व्यक्त केले.
शेवटी उपस्थित सर्व बौद्ध उपासिका महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती दोन गीत गाऊन अभिवादन केले व शेवटी घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. एन एल गायकवाड, यांनी केले

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india