*प्रतित्य समुत्पाद म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानातील कणा आहे -तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२१) प्रतित्य समुत्पाद कार्यकारण भाव सिद्धांत तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे प्रतित्य समुत्पाद म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानातील कणा समजला जातो असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे पंचशील नगर( कुंभारपट्टी )उमरगा या ठिकाणी वर्षावास कार्यक्रमातील २२व्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या ३२ विषयांपैकी आठवा विषय तथागत बुद्ध प्रतित्य समुत्पाद कार्यक्रम कार्यकारण भाव सिद्धांत या विषयावरती बोलत असताना प्रतिपादन केले.
यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे तसेच उपाध्यक्ष शिवराम अडसुळे सचिव मिलिंद कांबळे संघटक सुरज गायकवाड सचिव धीरज कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आरोही व्हणताळकर यानी केले.
पुढे बोलत असताना बौद्धाचार्य सुरवसे म्हणाले की,भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे कोणतीही घटना घडत असेल तर त्या घटनेला कारण असते. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते तर त्या घटनेला कारण असते म्हणजेच त्या ठिकाणी प्रतित्य समुत्पाद याप्रमाणे घटनेला आधार असतो असे मत सुरवसे यांनी व्यक्त केले. उदाहरण देऊन सांगत असताना सुरवसे म्हणाले की, वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्याचे मुख्य कारण काय असेल तर या वर्षावास कार्यक्रमातील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन करणे तसेच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने ठरवून दिलेल्या विषयावरती प्रवचन ऐकणे आणि भगवान बुद्धाने सांगितलेला दुःखमुक्तीचा मार्ग स्वीकारणे व आपल्या जीवनातील दुःख मुक्त करणे आहे
त्याचप्रमाणे मनुष्याला जेवण असेल तरच मनुष्य हा आपले काम व्यवस्थित करू शकतो म्हणजेच प्रतिित्य समूत्पाद कार्यकारण भाव सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुःख आणि अनित्य आनात्म निर्वाण या व रती आधारित आहे असे मत सुरवसे यांनी बोलत असताना व्यक्त केले.
यावेळी अंजनाबाई भालेराव राजश्री कांबळे रेणुका सूर्यवंशी मंगल भालेराव केसर व्हताळकर, आशा व्हताळकर, पुष्पा कांबळे, वर्षा कांबळे, सुवर्णा कांबळे, अविदा कांबळे, अनुसया कांबळे, लक्ष्मी भालेराव, सुवर्णा भालेराव, श्रद्धा गायकवाड, संस्कृती सूर्यवंशी, सानवी भालेराव, कीर्ती कांबळे, वर्षा सोनकांबळे, पोर्णिमा गायकवाड, सुमित सूर्यवंशी, रमेश कांबळे, चंद्रकांत गायकवाड, राजपाल कांबळे, पल्लवी कांबळे, प्रणवी कांबळे, वेदिका भाले आधी जणांचे प्रमुख उपस्थिती होती.
शेवटी शरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







