वागदरी येथे वर्षावास निमित्ताने “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन
———————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे वर्षवास निमित्ताने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे.
वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास म्हणजेच “वर्षावास” होय.पावसाळ्यात आषाढी पोर्णिमा ते अश्विनी पोर्णिमा या तिन महिन्यात बौध्द भिकु संघाने (धम्म गुरु) धम्म प्रसारासाठी गावोगावी न जाता आपापल्या बौध्द विहारात बसून धम्म प्रसार आणि प्रचार करावा अशा नियम होता.या तिन महिन्याचा कालावधी हा बौध्द धम्मात “वर्षावास” म्हणून ओळखला जातो .बौद्ध काळापासून ते आजतागायत बौध्द बांधव वर्षवास विविध उपक्रमाने सपन्न करतात.या तिन महिन्यात म्हणजे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हा कालावधी बौद्ध बांधवांच्या वतीने वर्षावासचा कालावधी म्हणून पाळला जातो.
या निमित्ताने देशभरातील बौद्ध बांधव आपापल्या बुद्ध विहारांमध्ये वेगवेगळे सामाजिक धार्मिक प्रबोधनात्मक उपक्रम राबवितात.दर रविवारी किंवा आपल्या सोयीने दर गुरुवारी बौद्ध विहारात बौद्ध बांधव एकत्र येऊन सामुदायिक रित्या बुद्ध वंदना, धम्मदेशना, ध्यान साधना असे विविध उपक्रम राबवितात.समाज प्रबोधन पर व्याख्यान गायन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वर्षावास काळात म्हणजे भर पावसाळ्यात बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार आणि प्रचार करणारे धम्म गुरु पूजनीय भंते धम्म प्रचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा कुठेतरी एकाच बुद्ध विहारात थांबून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करावा असा नियम अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्या भिकु संघासाठी केला होता.बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची ही प्रथा अनाधिकाला पासून चालत आली आहे.त्याचाच भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावास निमित्ताने दर गुरुवारी भारतिय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरी च्या वतीने येथील पंचशील बुद्ध विहार समाज मंदिरात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दर गुरुवारी बुद्ध वंदना व ग्रंथ वाचन केले जातआहे.
.दि.२७ ऑगस्ट २ o२६ रोजी गुरुवारी नियोजनाप्रमाणे बुद्ध वंदना व ग्रंथ वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी आंबेडकरी चळवळीतील भीमशाहीर चंद्रकांत दुपारगुडे (निलेगाव)आणि त्यांच्या सहचरणी शकुंतलाबाई चंद्रकांत दुपारगुडे व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरीच्या उपाध्यक्षा श्रीदेवी वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेऊन” बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस. के. गायकवाड भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखाध्यक्ष कविता गायकवाड सरचिटणीस उज्वला वाघमारे,कोषाध्यक्षा कोमल झेंडारे,संघटक ठकुबाई वाघमारे,भीमशाहीर तथा ग्राम शाखेचे संस्कार विभाग प्रमुख शिवाजी वाघमारे सह कार्यकर्ते उपस्थित होते.







