Best News Portal Development Company In India

महावितरण हादरले! बदलीसाठी लाच घेताना व्यवस्थापकांसह दिघे जेरबंद!

महावितरण हादरले! बदलीसाठी लाच घेताना उपव्यवस्थापकांसह तिघे जेरबंद !

बदलीचा सौदा ३० हजार! ACBच्या सापळ्यात तीन कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

इच्छित ठिकाणी बदली (पोस्टिंग) करून देण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी आणि आणखी पैशांची मागणी केल्याने महावितरणच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापकासह दोन लिपिकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी धडक कारवाई केली. या तिन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने महावितरण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी :
१) उदय दत्तात्रय बारकुल (वय ४१) – निम्नस्तर लिपिक, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, महावितरण, धाराशिव.
२) भारत व्यंकटराव मेथेवाड (वय ५०) – उपव्यवस्थापक, मानव संसाधन (वर्ग-२), विभागीय महावितरण कार्यालय, धाराशिव.
३) शिवाजी सिद्राम दूधभाते (वय ४०) – उच्चस्तर लिपिक, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव.

▪️नेमके प्रकरण काय?

तक्रारदार आणि त्याच्या मित्रास त्यांच्या नोकरीत इच्छित ठिकाणी पदस्थापना करून देण्यासाठी तिन्ही आरोपींनी संगनमत करून एकूण ३० हजारांची लाच स्वीकारली होती. तक्रारदाराकडून २० हजार, तर मित्राकडून १० हजार रुपये घेतले. यानंतरही काम न करता उलट आरोपी क्रमांक २ भारत मेथेवाड यांनी पुन्हा २० हजारांची अतिरिक्त लाचेची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने २६ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने २६ व २९ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. यात आरोपी उदय बारकुल यांनी घेतलेल्या पैशांपैकी १० हजार मेथेवाड आणि १० हजार दूधभाते यांना दिल्याचे समोर आले. तिघांनी समान उद्देशाने लाच स्वीकारल्याचे पुरावे समोर आल्याने कारवाई करण्यात आली.

▪️एसीबीचा सापळा

मंगळवारी (दि. १०) एसीबीच्या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचून तिन्ही आरोपींना रंगेसर ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत रोकड, मोबाईल व कागदपत्रे जप्त झाली असून घरांची झडती सुरू आहे. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

या कारवाईत एसीबी, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, धाराशिवचे उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे, निरीक्षक नरवटे, तसेच अंमलदार जाधव, तावस्कर, डोके, हजारे आदींचा सहभाग होता.

▪️नागरिकांना आवाहन

“शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी केले आहे.

टोल फ्री : १०६४
व्हॉट्सॲप : ९२७०२३१०६४

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india