*किशोरवयीन मुलींसाठी आहार व स्वच्छता महत्त्वाची…*
*डॉ. शशी कानडे*
*लाठी चॅम्पियनशिप मधील विजेत्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव*
उमरगा/लोहारा प्रतिनिधि आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नवरात्रीचे नऊ शाळा भेट या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी आहार व स्वच्छता महत्त्वाची असल्याचे मत डॉ. शशी कानडे यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे रोटरीच्या सचिव वंदना मेनकुदळे वर्षाराणी पाटील व क्रीडा शिक्षक महंमद रफी शेख सर उपस्थित होते कार्यक्रमात पुढे बोलताना डॉक्टर शशी कानडे म्हणाल्या की किशोरवयीन मुलींनी मासिक पाळीत स्वच्छता व आहाराकडे लक्ष द्यावे आपण ज्या गोष्टी स्पष्टपणे पालकांना व विशेष करून आईला मनमोकळेपणाने बोलावे शरीरात होत असलेल्या बदलाबद्दल घाबरून न जाता संवाद साधने गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी सचिव वंदना मेनकुदळे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात वापी गुजरात येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय लाठी चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या गीता गायकवाड श्रेयसी शिंदे शिवदर्शन शिंदे इस्माईल नदाफ अस्मिता भोसले आनंदी कांबळे या विद्यार्थिनींना गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शाळेसाठी जिंकलेली ट्रॉफी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांना देण्यात आली कार्यक्रमाला आठवी ते दहावीच्या मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा गुंडीले विद्यानंद सुत्रावे बशीर शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित तर प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले आभार वर्षाराणी पाटील यांनी मांनले.







