Best News Portal Development Company In India

शरण पाटिल फांऊंडेशनने २.०” अंतर्गत विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात विक्रमी व्रक्ष लागवड केल्याबद्दल गिनीज वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

शरण पाटिल फांऊंडेशनने २.०” अंतर्गत विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात विक्रमी व्रक्ष लागवड केल्याबद्दल गिनीज वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित धाराशिव अभियान २.०’ अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ऑगस्ट २०२६रोजी भव्य वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत शरण पाटील फाउंडेशनने सक्रिय सहभाग नोंदवत श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात अवघ्या १२ तासांत तब्बल १ लाख ५० हजार रोपांची लागवड करून उल्लेखनीय कामगिरी केली होती.

या वृक्षलागवड मोहिमेची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली असून, या विक्रमाबद्दल शरण पाटील फाउंडेशनला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन शिंगणकर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीचा भाग होता आले, याचे मनस्वी समाधान आणि अभिमान वाटत आसल्याचे शरण पाटिल यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना परिसरातील १० वेगवेगळ्या ठिकाणी, सुमारे ५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी १५ हजार रोपांची लागवड करून एकूण १ लाख ५० हजार रोपांचे रोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ५० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतानाच वृक्षलागवड आणि निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

निसर्ग संवर्धनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात योगदान देता आले आणि आपल्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली, ही निश्चितच अभिमानाची बाब आसल्याचे शरण पाटिल यांनी व्यक्त केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india