धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून तो बौद्धांच्या प्रगतीचा एक दिशादर्शक मार्ग आहे: शिक्षाबाई जेटीथोर
—————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी दिनाचे औचित्य साधुन नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपणाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिला आहे.त्या दिवसापासून आपण अशोका विजयादशमी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो परंतु धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ उत्सव नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी आपणाला आपल्या प्रगतीचा एक मार्ग दाखविला आहे.तेंव्हा तथागतांनी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार आत्मसात करून आपण कर्मकांड मुक्त व्यसनमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन महिला उद्योजिका धाराशिव कृषी प्रोडूसर कंपणी प्रा.लि. वागदरी च्या संचालिका तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांनी वागदरी ता. तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी पंचशील बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरी बी.आर.तरुण मंडळ वागदरी ता. तुळजापूर व समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने अशोक विजया दशमी दिनी येथील पंचशील बुद्ध विहार समाज मंदिरात ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सामुदायिक रित्या बुद्ध वंदना व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षाबाई रमेश जेटीथोर या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपणाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी मिळवून दिलेली आहे. तेव्हा तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची व समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा,महिलांनी आणि तरुणांनी आंबेडकरी चळवळीत,धम्म चळवळीत निष्ठेने सहभागी व्हावे असे आव्हाने शेवटी त्यांनी केले.
याप्रसंगी श्रामणेर चंद्रकांत वाघमारे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते रमेश जेटीथोर व महिला कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील (बुध वंदना) घेवून अभिवादन करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं (आठवले)चे धाराशिव जिल्हा सचिवएस.के.गायकड यांनी केले.यावेळी पंचशील बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच नागनाथ बनसोडे ज्येष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा वाघमारे,अनिल वाघमारे,शिवाजी वाघमारे जयंती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष दीपक वाघमारे बाळू वाघमारे,सुर्यकांत कुंडलिक वाघमारे,लक्ष्मण झेंडारे,मुकेश धाडवे,जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक वाघमारे,भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरीच्या उज्वला वाघमारे कविता गायकवाड,श्रीदेवी वाघमारे,कमल धाडवे, ठकुबाई वाघमारे,स्वाती गायकवाड,सुषमा वाघमारे,
विजयाबाई वाममारे, सोजराबाई वाघमारे,
कल्पना वाघमारे,
गेंदाबाई बनसोडे,भाग्यश्री वाघमारे,ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या कमळाबाई वाघमारे,सिमिंताबाई वाघमारे, राधाबाई वाघमारे सह ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते,महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








