Best News Portal Development Company In India

*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा*

*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा*

*बौध्द धम्माची ओळख निर्माण करणे महत्वाचे -बौध्दाचार्य उमेश सुरवसे*

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

(दि.२१) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.

तथागत भगवान सिध्दार्थ गौतम बुद्ध व सम्राट अशोकराजे, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे, प्रमुख वक्ते प्रा.सुधीर कांबळे जिल्हा संघटक,तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रा.शिवराम आडसुळे, यांच्या हस्ते करून त्रिशरण पंचशिल घेऊन अभिवादन करण्यात आले.

भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा उमरगा यांच्या वतिने बीएस आय पंचविस मिशन अंतर्गत वर्षावास कार्यक्रमात डॉ
बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व भारतीय बौध्द महासभाने ठरलेली बत्तीस विषयातील प्रवचन राबवणारे बुध्द विहार येथील पदाधिकारी तसेच बीएस आय पंचविस मिशन अंतर्गत छप्पन ग्राम शाखा स्थापन करण्याचे आदेश आहेत त्या प्रमाणे बाविस ग्राम शाखेचे पदाधिकारी यांचा सत्कार या वेळी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आला.

भारतीय बौध्द महासभा जिल्हा संघटक प्रा.सुधीर कांबळे यांनी बोलत असताना सांगितले की, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास धम्म देऊन जिवण जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म का स्वीकारला या विषयी सखोल असे मार्गदर्शन डॉ सुधीर कांबळे यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेच्या वतिने ठराव घेण्यात आला आहे.

आपली बौध्द म्हणून ओळख निर्माण करणे गरजेचे आहे इतर धर्मातील नागरिकांना आपण मुस्लिम,शिख, ख्रिश्चन,जैन , हिंदू, म्हणून सहज ओळखतो मात्र तसी ओळख बौधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ७० वर्षा पुर्वी आपणाला बौध्द म्हणून दिलेली आसताना आपण मात्र आपली बौध्द संस्कृती लपवण्याचा प्रयत्न करत आहोत .

आपला धर्म बौध्द आहे तर मग आपली संस्कृती ही वेगळी आहे आपले सन उत्सव ही वेगळे आहेत मात्र स्वाताला बौध्द समजणारा उपासक उपासिका यांनी विचार करून आपली ओळख बौध्द म्हणून करण्यासाठी बौध्द धम्माची संस्कृती,तसेच बौध्द धम्माचे आचरण आपण करायला पाहिजे तरच आपली ओळख बौध्द म्हणून ओळख होईल असे प्रतिपादन केले.

आज ७० व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपण असा संकल्प करू या की,आपल्या येथे बौध्द धम्मानुसार ग्रह पुजा,साक्षी गध, लग्नविधी, वाढदिवस,ईतर सर्व कार्यक्रम बौध्द पध्दतीने करतो मात्र त्या घरातील किती जनानी बालसंस्कार शिबीर,श्रामणेरशिबीर,बालश्रामणेर शिबीर महिला उपासिका शिबीर,युवक युवती शिबीर,या मध्ये किती नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

तसेच ज्या घरात बौध्दाचार्य विधी साठी जात आहेत त्या घरात त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वदना बुद्ध भिमस्मरण भिमस्तुती परित्राणपाठ कितीजनाना येते.पचशिलाचे पालन करतात का? करत असतील तर हे सर्व बौध्द उपासक उपासिका असण्याचे लक्षण आहेत .बौध्दाचार्याने सुध्दा पंचशिलाचे पालन करणे गरजेचे आहे.

जर बौध्दाचार्य पंचशिलाचे पालन करणारा नसेल तर त्याच्या हातुन विधी करून घेणे हे बौध्द धर्माचा आपमान आहे .तसेच ज्या घरातील विधी आहे त्याचा अपमान आहे त्यामुळे आपली बौध्द म्हणून ओळख निर्माण करणेसाठी आपण सर्व जन कटिबद्ध आहोत आसे म्हणत धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा उमरगा यांच्या वतिने बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी सर्व उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.व कार्यक्रमास उपस्थित असल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

या वेळी वर्षावास कार्यक्रम यशस्वी राबवणार्या सर्व बुध्द विहार व पदाधिकारी व बाविस ग्राम शाखा चे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे जिल्हा संघटक प्राध्यापक सुधीर कांबळे तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक शिवराम आडसुळे तालुका सरचिटणीस संगीता सोनकांबळे तालुका उपाध्यक्ष तातेराव मादळे तालुका उपाध्यक्ष रेखा कांबळे तालुका महिला सचिव उषा गायकवाड तालुका संरक्षण सचिव सुरेखा कांबळे तालुका संस्कार सचिव धीरज कांबळे मिलींद कांबळे तालुका हिशोब तपासणी शिवाजी जाधव तालुका संघटक लिंबारी गायकवाड नामदेव कांबळे आनंद कांबळे आदी जनाची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग शिवराम आडसुळे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india