Best News Portal Development Company In India

उमरगा येथील डॉ. के. डी. शेंडगे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शेंडगे इंग्लिश स्कूलच्या दांडिया महोत्सव विधानपरिषद चे आमदार बसवराज पाटिल यांच्या उपस्थितीत साजरा.

उमरगा येथील डॉ. के. डी. शेंडगे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शेंडगे इंग्लिश स्कूलच्या दांडिया महोत्सव विधानपरिषद चे आमदार बसवराज पाटिल यांच्या उपस्थितीत साजरा.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे व उपाध्यक्ष डॉ.आर.डी. शेंडगे यांनी आ.पाटील व मान्यवरांचे स्वागत केले. डॉ.सचिन शेंडगे यांनी या महोत्सवाचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन केले . याबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी त्यांना आ. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

सन १९९७ मध्ये अवघ्या १९ विद्यार्थ्यांसह डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूलच्या रूपाने लावण्यात आलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
आज या संस्थेच्या माध्यमातून ३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देवीची गाणी सादर करून जगदंबा मातेचा जागर केला देशभक्तीपर गीते पोवाडे भारुड भावगीत भक्ती गीत अभंग गवळण गोंधळ गीत लावणी आदी गीतावर बहारदार नृत्य अविष्कार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली.

यावेळी डॉ. सुजित पाटील, आप्पासाहेब पाटील, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, अशोक दूधभाते,गोरख घोडके, प्रताप सिंह, प्राचार्य सौ. आशा चोकडा, प्राचार्य गिरीश देशपांडे, डॉक्टर सुहासिनी सचिन शेंडगे डॉक्टर सारिका बीड दुर्गे डॉक्टर विजय बेडदुर्गे, डी.बी.कुलकर्णी पप्पू सगर गोविंद सूर्यवंशी आदी मान्यवरासह सर्व पालक ,समन्वयक, शिक्षक वृंद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले रंग बेरंगी वेशभूषाचे उपस्थित आणि टाळ्यांच्या गजरात कौतुक केले याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्कृतिक विभागप्रमुख पूनम सूर्यवंशी संचिता जाधव कोरिओग्राफर संतोष भस्मे आदींनी परिश्रम घेतले. तीन दिवस सतत या संस्थेने गरबा व दांडिया नृत्य सादर करून हजारो पालकांचे, महिला वर्गांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला . संस्थेकडून उपस्थित त्यांचे आभार मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india