*धानोरा दगड येथे भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखेचे उदघाटन*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.२४.भारतीय बौध्द महासभा संस्थापक बौधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष -डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीएस आय मिशन पंचविस प्रमाणे छप्पन ग्राम शाखा स्थापन करण्याचे आदेश संस्थेचे आहेत .
त्या प्रमाणे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा उमरगा यांच्या वतिने दि.२० आक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता धानोरा दगड येथे भारतीय बौध्द महासभा चे जिल्हा संघटक प्रा डॉ सुधीर कांबळे यांच्या हस्ते भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा धानोरा दगड क्र १९ चे उदघाटन करण्यात आले.
या वेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे व सर्व मान्यवर यांच्या हस्ते करून त्रिशरण पंचशिल सामुदायिक घेऊन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे हे होते तर प्रमुख वक्ते व उदघाटक प्रा डॉ सुधीर कांबळे होते.सर्व तालुका पदाधिकारी सरचिटणीस -सगीता सोनकांबळे,प्रा शिवराम आडसुळे, रेखा कांबळे उषा गायकवाड धिरज कांबळे, मिलींद कांबळे, शिवाजी जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रमुख वक्ते डॉ सुधीर कांबळे यांनी स्त्रिया वरील बधने व बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हिंदू कोड बील,तसेच सथीप्रथा, अंधश्रद्धा आदी विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
या वेळी अध्यक्षीय समारोप करताना तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी भारतीय बौध्द महासभा चे भुमीका व बौध्द संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केले व संस्थेचे आदेशाचे पालन ,व २४ प्रशिक्षण शिबीर तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून बौध्द संस्कृती जपावे असे सांगितले व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी सर्व ग्रामशाखा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी शाखाप्रमुख विकास गायकवाड,अक्षय गायकवाड, विशाल गायकवाड,अबुताई कांबळे,रेश्मा गायकवाड,राणी गायकवाड, यशवंत गायकवाड,छाया गायकवाड,मनिषा गायकवाड, सिध्देश्वर कांबळे,सोजरबाई गायकवाड, आम्रपाली गायकवाड,समता कांबळे,राजश्री गायकवाड,तानाजी गायकवाड,रोहीत गायकवाड,माधव गायकवाड,आशा गायकवाड,अमोल कांबळे,आकाश गायकवाड, अभिषेक कांबळे,अमोल कांबळे तुळशीदास गायकवाड, राजेंद्र गायकवाड गौतम गायकवाड उत्तम गायकवाड किशन गायकवाड,आशा गायकवाड उषा कांबळे शिला कांबळे दिशा गायकवाड अंजली गायकवाड जयश्री गायकवाड सघप्रिया गायकवाड कुशाबाई कांबळे आदीसह सर्व बौध्द उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अवधुत जाधव यांनी केले तर प्रस्तावीक सिध्देश्वर कांबळे यांनी केले तर आभार विकास गायकवाड यांनी मानले.







