Best News Portal Development Company In India

*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या 30 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ऑर्ट कॉम्पिटिशन साठी निवड*

*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या 30 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ऑर्ट कॉम्पिटिशन साठी निवड*
*साहील राठोड ला आर्ट मेरिट अवॉर्ड*

*12 विद्यार्थ्यांना सुवर्ण*
*8 विद्यार्थ्यांना सिल्व्हर*
*6 विद्यार्थ्यांना ब्राँझ*
*4 विद्यार्थ्यांना स्पेशल गिफ्ट*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या 30 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन साठी निवड झालेली आहे मुंबई येथील रंगोत्सव स्पर्धेत प्रशालेतील 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी धनराज तेलंग बशीर शेख विद्यानंद सुत्रावे नागेश स्वामी प्रवीण शिंदे सदानंद कुंभार महादेव कुनाळे सोनाली मुसळे वर्षाराणी पाटील भाग्यश्री पंडित उपस्थित होते.

रंगोत्सव कॉम्पिटिशन मध्ये कलरिंग, हॅन्डरायटिंग ,कोलाज मेकिंग ,कार्टून मेकिंग, ग्रेटिंग कार्ड मेकिंग, टॅटू मेकिंग, स्केचिंग फिंगर, मास्क मेकिंग, कॅरीकेचर कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले साहील राठोड या विद्यार्थाला आर्ट मेरिट अवॉर्ड मिळाला तर या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले प्रशालेतील चित्रकला शिक्षक दत्तात्रय इगवे यांना बेस्ट टीचर्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

तर सुवर्ण पदक मिळवलेले झोया मोमीन, मेघना अशोक अंबुलगे, क्रांती कांबळे, महंमद मुल्ला ,अफान बागवान, जय देवी जाधव, कुलसुम उस्ताद, वैष्णवी केदारे,अफीया उस्ताद, लक्ष्मण माने, सिमरन जमादार, श्रद्धा विनोद जाधव, सिमरन जमादार,तर सिल्वर मेडल मिळालेले पलक वरवटे योगेश्वरी जाधव सोहेब चाबरु,तस्मिया बागवान, अनुराधा कदेरे, सुभान हन्नुरे, वैष्णवी कोळणूरे ,आदित्य पांडे, भाग्यश्री कांबळे, रहमान बागवान, प्रीती जाधव, आस्था दुधभाते,वैष्णवी जाधव, सुजाता दंडगुले, अथर्व दुधभाते, स्वरा गायकवाड, पूजा मोरे, अली अब्बास इस्माईल उस्ताद,यांना ब्राँझ मेडल मिळाल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ऑर्ट कॉम्पिटिशन साठी निवड झाली आहे त्यामुळे उपस्थित शिक्षकांच्या हस्ते यांचा गौरव करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार सोनाली मुसळे यांनी मांनले कार्यक्रमास पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india