*इन्स्टाग्राम फेसबुक वर खाते काढण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे*
*न्यायाधीश ए एम खान*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये उमरगा तालुका विधी सेवा समिती व विधीन्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुरक्षित बचपन अभियान कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षपदावरून जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एम खान साहेब बोलत होते .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश पी बी रेमणे, न्यायाधीश श्रीमती डी एस तांबे अँड सोम शंकर स्वामी अँड शिंदे मुख्याध्यापक पद्माकर मोरे धनराज तेलंग व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते पुढे बोलताना ए एम खान म्हणाले की बालकांचे लैंगिक शोषण अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012, सायबर गुन्हेगारी, तसेच बालकांच्या शोषणाविरोधात कायद्याची माहिती देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सुरक्षित बचपन अभियान देशभरात राबविल्यास येत आहे इंटरनेट च्या वापरामुळे आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहोत बाल वयात गाडी चालवणे मोबाईल वापरणे नियमाला धरून नसतानाही आपण मोबाईलवर इन्स्टाग्राम फेसबुक अकाउंट उघडतो त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आई-वडिलांची सेवा करावी असे मत व्यक्त केले .
यावेळी श्रीमती डी एस तांबे मॅडम यांनी पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले शाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित तर आभार विद्यानंद सुत्रावे यांनी मांनले.







